Home गुन्हेवार्ता बेपत्ता युवकाचा मृतदेह तलावात आढळला

बेपत्ता युवकाचा मृतदेह तलावात आढळला

0

ब्रम्हपुरी,दि.२९ : ब्रम्हपुरी तालुक्यातील दक्षिण परिसराअंतर्गत येणाऱ्या वांद्रा येथील तलावात आज दिनांक २९ एप्रिल रोजी या बेपत्ता झालेल्या युवकाचा मृतदेह सकाळच्या सुमारास आढळून आला. मृत संदीप झिटुजी लोनबले (वय २५ रा.मेंडकी) हा  २६ एप्रिल २०१८ पासुन घरुन बेपत्ता झाला होता. याबाबत विचारपुस केली असता, या युवकाला मानसिक त्रास होता. त्यामुळे तो इकडे तिकडे भटकत राहायचा तेव्हा पासून बेपत्ता होता. आज २९ एप्रिलला सकाळी ७:०० वाजताच्या दरम्यान वांद्रा येथील तलावात त्याचा मृतदेह  पाण्यावर तरंगत असताना गावकऱ्यांना दिसताच पोलीस स्टेशन मेंडकी येथे माहिती दिली. सदर युवकांचा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आला. याबाबत पुढील तपस लोहटकर साहेब व रायपूरे करीत आहेत.

Exit mobile version