Home शैक्षणिक पुस्तकी अभ्यास म्हणजे बुद्धिमत्ता नव्हे, कर्तुत्व महत्वाचे – अविनाश धर्माधिकारी 

पुस्तकी अभ्यास म्हणजे बुद्धिमत्ता नव्हे, कर्तुत्व महत्वाचे – अविनाश धर्माधिकारी 

0
गोंदिया,दि. १ः- प्रशासकीय सेवेत काम करताना बरेच अनुभव आले. केवळ पुस्तकी अभ्यास म्हणजे बुद्धिमत्ता नसून कर्तुत्व महत्वाचे आहे. मेंदू चांगला असेल तर प्रत्येक व्यक्ति बुद्धिवंत आहे. कुठल्याही क्षेत्रात कॅरिअर घडविताना आधी स्वतःला ओळखा. आपल्या आवडत्या क्षेत्रात उडी घेतल्यानंतर यशस्वी होण्यासाठी घेतलेले कठोर परिश्रम हेच यशाचे रहस्य आहे. असे प्रतिपादन चाणक्य मंडल परिवाराचे संस्थापक संचालक माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी केले.
ते फाच्र्यून फाऊंडेशन व चाणक्य मंडल परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कॅरिअर आणि स्पर्धापरीक्षाङ्क या विषयावर मंगळवारी ३१ जुलै रोजी शहरातील जलाराम लॉनच्या सभागृहात आयोजित मार्गदर्शन मेळाव्यात मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी प्रामुख्याने फाच्र्यून फाऊंडेशन चे अध्यक्ष आमदार प्रा. अनिल सोले, शिक्षक आमदार ना. गो. गाणार, भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, कार्यक्रमाचे संयोजक विनोद अग्रवाल, नगराध्यक्ष अशोक इंगळे, जिप उपाध्यक्ष अल्ताफ हमिद,सभापती विश्वजीत डोंगरे, शैलजा सोनवाने, विरेंद्र अंजनकर,शहर अध्यक्ष सुनील केलनका,सीता रहांगडाले, ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव विरेंद्र जायस्वाल, भाजयुमो जिल्हा अध्यक्ष पंकज रहांगडाले,संजय कुळकर्णी, नगरसेवक भरत क्षत्रिय,समीर आरेकर आदी उपस्थित होते.फाऊंडेशन तर्फे येणाèया १० सप्टेंबर रोजी गोंदिया येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यात येणार असून अनेक कंपन्याच्या माध्यमातून मुलाखत घेऊन निवड प्रक्रिया राबविली जाणार असल्याची घोषणा करून युवकांना रोजगाराच्या संधी मिळणार असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद अग्रवाल यांनी करताना कॅरिअर व स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शन गोंदिया जिल्ह्यातील विद्याथ्र्यांना मोलाचे ठरणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. सविता बेदरकर यांनी केले. या वेळी मोठ्या संख्येने तरुण-तरुणी विद्यार्थी उपस्थित होते.

Exit mobile version