Home महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागातील डॉक्टरांची रिक्त पदे तातडीने भरण्यात येणार-अर्जुन खोतकर

पशुसंवर्धन विभागातील डॉक्टरांची रिक्त पदे तातडीने भरण्यात येणार-अर्जुन खोतकर

0

नागपूर, दि. 18 : राज्यातील पशुसंवर्धन विभागातील डॉक्टरांची रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील अशी माहिती पदुम राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासामध्ये दिली.
पुणे जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या कामधेनू दत्तक योजनेबाबत सदस्य प्रा. मेधा कुलकर्णी यांनी प्रश्न विचारला होता. त्यावेळी उत्तर देताना श्री. खोतकर म्हणाले, राज्यातील दुध उत्पादकता वाढावी, यासाठी कामधेनू दत्तक योजना राज्यात राबविण्यात येत आहे. राज्यातील 13 हजार 411 गावांमध्ये ही योजना कार्यान्व‍ित असून 4 हजार 878 गावे शिल्लक आहेत. ज्या गावात 300 पशुधन असेल त्या गावात ही निवड त्या योजनेसाठी केली जाते.पुणे जिल्ह्यात ही योजना योग्य प्रकारे राबविली गेली नसल्याने सदर
प्रकरणी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे यांच्यामार्फत चौकशी सुरु असून, आयुक्त पशुसंवर्धन, पुणे यांनी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, पुणे यांना देखील सदर प्रकरणी चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत, असे श्री. खोतकर यांनी सांगितले.यावेळी झालेल्या चर्चेत आमदार सर्वश्री जयकुमार गोरे, बाबूराव पाचर्णे,
संग्राम थोपटे यांनी सहभाग घेतला.

Exit mobile version