Home महाराष्ट्र महामंडळे, मंडळे व प्राधिकरणाच्या रिक्त पदांवर नियुक्त्या जाहीर

महामंडळे, मंडळे व प्राधिकरणाच्या रिक्त पदांवर नियुक्त्या जाहीर

0

मुंबई,दि.01ः- राज्य शासनाने विविध विकास महामंडळे, मंडळे व प्राधिकरणाच्या रिक्त असलेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती पदांवरच्या एकूण २१ नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. जाहीर केलेल्या नियुक्त्यांमध्ये १0 महामंडळे, ६ मंडळे, २ प्राधिकरण व एका आयोगातील पदाचा समावेश आहे.
अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी हाजी अरफात शेख यांची तर उपाध्यक्षपदी जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर नियुक्ती झाली आहे. कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळांच्या सभापतीपदी बाळासाहेब ज्ञानदेव पाटील यांची वर्णी लागली आहे. मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी हाजी एस. हैदर आझम, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी सदाशिव दादासाहेब खाडे, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या अध्यक्षपदी नरेंद्र अण्णासाहेब पाटील तर उपाध्यक्षपदी संजय उर्फ संजोय मारुतीराव पवार यांची निवड झाली आहे. खनिकर्म महामंडळाच्या अध्यक्षपदी आशिष जयस्वाल, हातमाग महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रकाश नकुल पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी नितिन संपतराव बानगुडे-पाटील, कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी जगदिश भगवान धोडी, गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी उदय सामंत, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी ज्योती दिपक ठाकरे, मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या सभापतीपदी विनोद घोसाळकर, झोपडपट्टी सुधार मंडळाच्या सभापतीपदी विजय नाहटा, किमान वेतन सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी रघुनाथ बबनराव कुचिक, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या अध्यक्षपदी मधु चव्हाण, लघु उद्योग विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी संदिप जोशी, शहर व औद्योगिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रशांत ठाकूर, नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या अध्यक्षपदी मो. तारिक कुरैशी, महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी राजा उर्फ सुधाकर तुकाराम सरवदे यांची नियुक्ती झाली आहे.

Exit mobile version