Home महाराष्ट्र यवतमाळात दोन दिवस राज्यस्तरीय बिरसा पर्व

यवतमाळात दोन दिवस राज्यस्तरीय बिरसा पर्व

0

यवतमाळ,दि.12 : बिरसा मुंडा यांच्या १४३ व्या जयंती दिनानिमित्त यवतमाळात १७ आणि १८ नोव्हेंबरला राज्यस्तरीय बिरसा पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. १५ नोव्हेंबरला महारॅली काढण्यात येणार आहे. या पर्वासाठी राज्यभरातून समाजबांधव येणार असून आदिवासींच्या प्रश्नांना वाचा फोडली जाणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
बिरसा पर्व उत्सव समितीने स्थानिक समता मैदानावर हे आयोजन केले आहे. बनावट जातप्रमाणपत्राद्वारे आदिवासींच्या राखीव जागांवर नोकरी बळकावणाऱ्यांवर कारवाईचे आदेश ६ जुलैला सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या आदेशाची अद्यापही अंमलबजावणी झाली नाही. विद्यार्थ्यांच्या डीबीटीचा प्रश्न कायम आहे.
चर्चासत्राकरिता आदिवासी कल्याण समितीचे अध्यक्ष आमदार डॉ. अशोक उईके, अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या उपाध्यक्ष अनुसयाताई उईके, पालकमंत्री मदन येरावार, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, अखिल भारतीय आदिवासी प्रधान संघटनेचे अध्यक्ष दिनेश मडावी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग, विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, साहित्यिक बाबाराव मडावी आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
पत्रकार परिषदेला आदिवासी बिरसा पर्व उत्सव समितीचे अध्यक्ष राजू चांदेकर, कार्याध्यक्ष राजू केराम, सचिव पवन आत्राम, कोषाध्यक्ष किशोर उईके, सहसचिव दिलीप कुडमेथे, शैलेश गाडेकर, बंडू मसराम, नीलेश पंधरे, दिलीप शेडमाके, देवेंद्र चांदेकर, सुरेश वालदे, श्रीकांत किनाके, विशाल राजगडकर, कृष्णा पुसनाके उपस्थित होते.

Exit mobile version