Home महाराष्ट्र चेक बाउंस झाल्यास दीड हजाराच दंड-महावितरण

चेक बाउंस झाल्यास दीड हजाराच दंड-महावितरण

0

मुंबई,दि.1- महाविरतरणला वीज बिलापोटी दिलेला चेक जर बाऊंस झाला तर ग्राहकाकडून आता 350 रुपयांएवजी हजार पाचशे रुपये दंडापोटी आकारले जातील.वीजदराच्या निश्चितीकरणासाठी महावितरणनेदाखल केलेल्या मध्यावधी आढावा याचिकेच्या सुधारित आदेशामध्ये महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने हा आदेश दिला आहे.

महावितरणच्या १६ परिमंडलातील सुमारे ५ लाख ८२ हजार लघुदाब वीजग्राहक हे धनादेशाद्वारे दरमहा सुमारे ५४२ कोटी रुपयांच्या वीजबिलांचा भरणा करतात. मात्र, यातील सुमारे दहा हजार धनादेश महिन्याला विविध कारणांमुळे वटत नाहीत. याकरिता संबधित वीजग्राहकांना यापूर्वी ३५० रुपये दंड आकारला जात होता, परंतु आता १हजार५०० रुपये किंवा बॅक चार्जेस यापैकी जी रक्कम जास्त असेल, तो दंड म्हणून आकारण्यात येणार आहे.

वीजबिल भरण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी दिलेला धनादेश वटणे आवश्यक असते. त्यानंतरच बिलाची रक्कम प्राप्त झाल्याची नोंद होते. परंतु अनेक वीजग्राहक अंतिम मुदतीच्या एक-दोन दिवसांपूर्वी धनादेशाद्वारे वीजबिलाची रक्कम भरतात. धनादेश वटण्यास साधारणत: तीन ते चार दिवसांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे ग्राहकाने देय तारखेपूर्वी कार्यालयीन कामकाजाच्या तीन दिवस अगोदर धनादेश देणे आवश्यक आहे. मुदतीनंतर बील भरल्यास ग्राहकांना धनादेशद्वारे भरलेली रक्कम थकबाकी म्हणून पुढील बिलात लागू होते. कोणत्याही कारणाने चेक बाउंस झाला, तर आर्थिक दंडासह वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाते.

Exit mobile version