Home मराठवाडा बेघरांचे प्लाटसाठी बिलोली तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण

बेघरांचे प्लाटसाठी बिलोली तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण

0
नांदेड ( सय्यद रियाज),दि.13- बिलोली तालुक्यातील मोेेै अटकळी येथील २० बेघर लाभार्थ्यांनी  प्लाट मिळावे या मागण्यांसाठी बिलोली तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास १२ सप्टेंबर पासून सुरवात केली आहे.बिलोली  तालुक्यातील मौजे अटकळी  येथे १९८३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मन्याड या नदीला पूर आल्यामुळे अटकळी गावाचे पुनर्वसन करण्यात आले होते.शासनाने पुनर्वसनांतर्गत २० बेघर लाभार्थ्यांना गट क्रमांक ७ मध्ये ८२ आर जमिनी खरेदी केली.परंतु आज पर्यंत लाभार्थ्यांना  प्लॉटचे वाटप करण्यात आलेच नाही.उलट काही लोकांनी अतिक्रमण केल्याचे उपोषणकर्तेच्यां म्हणने आहे.या उपोषण आंदोलनात बाबू चांदसाब, हाजूमिया हैदरसाहब ,मैनुसाब नुरमोहम्मद, महादाबाई कोंडीबा पदेवाड,देवबाई बालु, लक्ष्मीबाई शंकर,शीतलसिंह रघुवंशी,मीराबाई लक्ष्मण सुर्यवंशी,चंद्राबाई बाबाराव चिटकुलवाड कासिम महबूब शाह  अादी सहभागी झाले आहेत.

Exit mobile version