Home मराठवाडा अमरनाथ यात्रेकरूंनी सिडबॉल द्वारे पेरल्या हजारो बिया

अमरनाथ यात्रेकरूंनी सिडबॉल द्वारे पेरल्या हजारो बिया

0

नांदेड,दि.25ः-मरनाथ यात्री संघातर्फे आयोजीत करण्यात आलेल्या नांदेड ते रत्नेश्‍वरी पाऊस दिंडीच्या समारोप प्रसंगी गडावर धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो यात्रेकरूंनी जपानी पध्दतीचे सिडबॉल तयार करून हजारो बीयाची लागवड केली.
बालाजी मंदिर हनुमानटेकडी येथे सकाळी सहा वाजता प्रतिष्ठीत व्यापारी शांतीलाल पटेल यांच्या हस्ते झेंडा दाखवून सतराव्या पाऊस दिंडीची फटाक्याच्या आतिषबाजीत सुरूवात करण्यात आली. रस्त्यामध्ये जागोजागी भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, कैलास महाराज वैष्णव, गणेश झोळगे,सौ.सुषमा नरसिंह ठाकूर, स्वच्छता दुत माधवराव झरीकर यांच्या तर्फे चहा-फराळा व केळीची व्यवस्था करण्यात आली. ढोल ताश्याच्या गजरात चौदा किमी अंतर यात्रेकरूंनी सहज पूर्ण केले.रतनेश्वरी देवीची जेष्ठ पत्रकार शंतनु डोईफोडे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.वन विभागाकडून मिळालेल्या बिया आणि नागरिकांनी वर्षभर घरी साठविलेल्या बियांचे दीपक मोरतळे यांच्या मार्गदर्शनाखाली सिडबॉल तयार करण्यात आले.महाराष्ट्र शासनाच्या तेरा कोटी वृक्ष लागवड योजने अंतर्गत गडावर पेरणी करण्यात आली.यानंतर शंतनु डोईफोडे,वसंत मैय्या,उमाकांत जोशी,ऍड.चिरंजीलाल दागडिया,रामराव राऊत महाराज,प्रा.दीपा बियाणी,निता दागडिया,सुषमा गहेरवार यांच्या हस्ते यात्रेकरूना टी शर्ट ,टोपी व ओळखपत्र देण्यात आले.भाऊ स्टील होम तर्फे राज ठाकूर यांनी प्रवासात उपयोगी पडतील अश्या वस्तूचे वाटप केले.
.दरवर्षी प्रमाणे दानशूर व्यापारी जितेंद्र भयानी यांच्यातर्फे ठेवण्यात आल्या महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घेतला. पाऊस दिंडी मध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी राम गगराणी, प्रदीप गिल्डा, किरण तोष्णीवाल, गंगालाल यादव,गोपाल बंग,सुरेंद्रसिंग ठाकूर,डॉ.स्वरूपसिंग हजारी,डॉ.बसवराज कणजे,सतीश बिंदु,लड्डूसिंग बैस,शिवकमलसिंग चौहान,अशोक कंधारकर,डॉ.टी. आर.सोनटक्के , हे सपत्निक सहभागी झाले होते.याशिवाय प्राचार्य नारायण शिंदे,हरदिपसिंघ रामगडीया,
मंजू बियाणी,शततारका पांढरे,वर्षा गायकवाड, संगीता बियाणी,अश्विनी पाटील,जयश्री सोनी,के.अनुसया,ज्योती देमनगुंडे,संगीता धारसुरकर, विजया घिसेवाड,प्रेमलता गटानी,सुशीला मुंदडा,अलका बियाणी,प्रणिता कळसकर यांच्यासह शेकडोजन सहभागी झाले होते.पाऊस दिंडी यशस्वी करण्यासाठी निलेश माच्छलवार,सुभाष देवकत्ते,गोविंद रनखांब,विलास डक,मारोती विष्णुपुरीकर,विठ्ठल डक,व्यंकट मठपती,वैजनाथ वैद्य,व्यंकटी जोगदंड,ज्ञानेश्वर सरोदे,किशोर ठाकूर,व्यंकटेश वाकोडीकर,अविनाश भयानी,सचिन झरीकर,राजू सुरतवाला,राजू मोरे,आशिष स्वामी,संदीप गवारे यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version