Home मराठवाडा भीशीच्या नावाखाली सात लाखाची फसवणूक

भीशीच्या नावाखाली सात लाखाची फसवणूक

0

नांदेड,दि..02: भीसीचे पाच लाख व हातउसणे घेतलेले दोन लाख असे सात लाख रुपये परत न करता संबंधितांची फसवणूक करणाऱ्या एका महिलेसह चार जणांवर वजिराबाद ठाण्यात शुक्रवारी (ता. 30) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहराच्या कुर्तडीकर कॉम्पलेक्स चीखलवाडी येथे अभिषेक कलेक्शन नावाचे दुकान आहे. या ठिकाणी अभिषक प्रविण सिंघल यांनी भीसीच्या नावाखाली (ता. 10) एप्रिल 2016 ते 10 नोव्हेंबर 2018 दरम्यान काही खातेदारांचे पैसे जमा केले. त्यातच चंद्रकांत यलप्पा मेटकर या वकिल व्यावसायिकानेसुध्दा बचत म्हणून दरमहा 25 हजार याप्रमाणे 20 हप्ते जमा केले. एवढेच नाही तर त्यांनी परत दोन लाख रुपये हातउसणे दिल्याचे तक्रारीत नमुद केले आहेत. एकूण सात लाख रूपये ते मागील अनेक दिवसांपासून परत मागत होता. परंतु पैसे देण्यासाठी अभिषेक सिंघल हा टाळाटाळ करीत होता. शेवटी पुन्हा जर पैसे मागितलास तर ठार मारण्याची धमकी दिली.आपली फसवणूक केली म्हणून चंद्रकांत मेटकर यांच्या फिर्यादीवरुन वजिराबाद पोलिसांनी अभिषेक प्रविण सिंघल, प्रविण सिंघल, गुरूप्रीतसिंग अजमानी आणि एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरिक्षक संदिप शिवले यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार विक्रांत हराळे हे करीत आहेत.

Exit mobile version