Home मराठवाडा संकटग्रस्त महिलांच्या आधारासाठी वन स्टॉप सेंटर महत्वाचे – प्रमुख जिल्हा न्यायाधीश

संकटग्रस्त महिलांच्या आधारासाठी वन स्टॉप सेंटर महत्वाचे – प्रमुख जिल्हा न्यायाधीश

0

परभणी, दि.29 :- संकटग्रस्त महिलांसाठी बोलताना महिला ही अबला नसून ती सबलाच असते परंतू ठरावीक अशा संकटात त्यांना मानसिक सल्ल्याची गरज असते या वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून बाल कल्याण समिती, चाईल्ड लाईन, महिला व बाल विकास विभाग व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण या सर्वांच्या समन्वयाने त्यांना आधारभूत सेवा मिळतील असे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीय श्रीमती उर्मिला जोशी यांनी सांगीतले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी परभणी यांनी त्यांचे अध्यक्षीय भाषणात वन स्टॉप सेंटरच्या नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात येईल व संकटग्रस्त महिलांना वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून आवश्यक त्या आधारभूत सेवा देण्यात याव्यात असे सांगितले.
संकटग्रस्त महिलांना वैद्यकीय मदत,निवारा, समुपदेशन,मानसोपचार तज्ञाची सेवा,तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस विभागाची सेवा, कायदेशीर मदतीसाठी विधी सेवा प्राधिकरणाची सेवा एकाच छताखाली मिळण्यासाठी वन स्टॉप सेंटरही योजना भारतामध्ये टप्प्या-टप्प्याने सुरु केली असून जिल्ह्यातील संकटग्रस्त महिलांसाठी निवारा (वन स्टॉप सेंटर) चे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात आज उदघाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उदघाटन श्रीमती उर्मिला एस.जोशी/फलके, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी पी.शिवशंकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शेख अकबर शेख जाफर, सचिव, जिल्हा विधीसेवा प्राधिकरण परभणी, डॉ.जावेद अथर, जिल्हा शल्य चिकित्सक परभणी, डॉ वडकुते जिल्हा क्षयरोग अधिकारी, सुर्यकांत कुलकणी सामाजिक आर्थिक विकास संस्था केरवाडी, संजय केकान अध्यक्ष बाल कल्याण समिती व सदस्य तसेच वन स्टॉप सेंटर व्यवस्थापन समितीच्या सदस्य प्रा.हर्षा सुर्यवंशी, ॲङयास्मीन फिरदोस, डॉ.आरती सुदेवाड व इतर मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version