Home मराठवाडा कवयित्री पंचवटी गोंडाळे यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान

कवयित्री पंचवटी गोंडाळे यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान

0

नांदेड,दि.24ः-फुलेरा कलेचे माहेरघर आयोजित चौथी काव्य संमेलन हिरव्या हिरव्या राणी कवितांची गाणी व फुले वेचीता पुस्तक प्रकाशन सोहळा महाबळेश्वर येथे पार पडला. या कार्यक्रमाला महाराष्ट्रभरातून प्रतिभावंत कवी कवयित्रीनी हजेरी लावली होती.या कार्यक्रमाचे आयोजन सुनिल सातपुते यांनी केले होते.यावळी कवयित्री पंचवटी संभाजी गोंडाळे यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सुभाष पांचाळ यांनी मंगलाष्टके सादर करुन विधिवत पुनर्विवाह लावला.या कार्यक्रमातच ” मनाच्या उंबरठ्यावर” या काव्यसंग्रहाला सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रह म्हणून साहित्यप्रेमी 2019 हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.त्यावेळी रेखाताई भंडारे ,चंदनमलशेठ बाफना,उषा भोसले,अगरकर साहेब, बोरा,रज्जाक शेख ,वरूडे , सुनिल सातपुते,दर्शनभाऊ, ऊफाडे,गौरीनंदन व संपन्न गोंडाळे,संभाजी गोंडाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
साहित्यज्योती संकल्प क्रांतिकारी विचार मंच महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय साहित्यप्रेमी पुरस्कार 2019, कवी प्रा.गुलाबराजा फुलमाळी यांच्या शुभ हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत निवडक तीन पुरस्कार प्रदान करण्यात आले.त्यात सौ.पंचवटी संभाजी गोंडाळे/जाधव “कवयित्री, गीतकार”, सुनील सातपुते “प्रसिद्ध व्यंगचित्रकार” व रज्जाक शेख “हास्य कवी, गझलकार” यांचा समावेश आहे.
या पुरस्काराचे मानकरी फुलोरा परिवाराची सर्व टीम व महाराष्ट्रातील सर्व कवी कवियत्री असल्याचे सौ.पंचवटी संभाजी गोंडाळे यांनी म्हटले आहे.

Exit mobile version