Home मराठवाडा सुशिला भोजराज शेट्टी यांना आंतरभारतीचा स्नेहसंवर्धन पुरस्कार जाहीर

सुशिला भोजराज शेट्टी यांना आंतरभारतीचा स्नेहसंवर्धन पुरस्कार जाहीर

0

आंबेजोगाई,दि.12ः-आंतरभारती शाखा अंबाजोगाईच्या वतीने दर वर्षी 15 ऑगस्ट रोजी दिला जाणारा स्नेहसंवर्धन पुरस्कार यावर्षी श्रीमती सुशिला भोजराज शेट्टी यांना जाहिर करण्यात आला आहे. श्रीमती शेट्टी ह्या त्यांचे दिवंगत पती भोजराज यांच्या समवेत 60च्या दशकात आंबाजोगाई येथे येऊन स्थायिक झाल्या. पती निधनानंतरही त्यांनी आंबाजोगाई येथेच राहण्याचा निर्णय केला. त्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्यात येत असल्याचे आंतरभारती आंबाजोगाईच्या अध्यक्ष डॉ प्रा अलका वालचाळे यांनी सांगितले.

15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आंतरभारतीचे राष्ट्रीय सरचिटणीस अमर हबीब व मनस्विनी महिला प्रकल्पाच्या प्रमुख डॉ अरूंधती लोहिया-पाटील उपस्थित रहाणार आहेत. परंपरेनुसार माजी सत्कारमूर्ती आनंदराव अंकम यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाईल.आंबाजोगाईच्या गौरवशाली परंपरेत ह्या सत्काराला विशेष महत्व असल्यामुळे आंबाजोगाईवर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन या कार्यक्रमाचे संयोजक संतोष मोहिते यांनी केले आहे.बैठकीस अमर हबीब , अलका वालचाळे, वैजनाथ शेंगुळे, मुजीब काजी, प्रा.अनंत कांबळे, आनंदराव अंकम, राजाभाऊ कुलकर्णी, अनिरूद्ध चौसाळकर, संतोष मोहिते, अॅड. कल्याणी विर्धे, उदय आसरडोहकर, आदी उपस्थित होते.

अन्य प्रांतातून येऊन आंबाजोगाईत स्थायिक झालेल्या व आंबाजोगाईच्या गौरवात भर घालणाऱ्या व्यक्तीचा आंतरभारती, आंबाजोगाईच्या वतीने दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी सत्कार केला जातो.त्याअंतर्गत बी वाय खडकभावी (कर्नाटक) 2014,रुपडाजी (गुजरात) 2015,एम बी शेट्टी (कर्नाटक) 2016,शंकर जी मेहता (राजस्थान) 2017,आनंदराव अंकाम (तेलंगण) 2018 व
सुशिला भोजराज शेट्टी (कर्नाटक) 2019 यांचा समावेश आहे.

Exit mobile version