Home राजकीय जनतेला भ्रमित करणार्‍या भाजप सरकारला धडा शिकवा : खा.पटेल

जनतेला भ्रमित करणार्‍या भाजप सरकारला धडा शिकवा : खा.पटेल

0

गोंदिया दि.१८-: केंद्र व राज्यातील भाजप सरकार विकासकामे व विविध योजनांच्या लाभाच्या नावावर जनतेला भ्रमित करीत आहे. मागील साडेतीन वर्षाच्या कालावधीत जनतेला लाभ होईल, असे कोणतेच कामे करण्यात आली नाही. उलट जनतेविरोधी निर्णयांनी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ही निवडणूक सर्वसामान्य नागरिक, वंचित
समाजाचे हक्क व क्षेत्राच्या विकासासाठी आहे म्हणून विकासाच्या नावावर सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल करणार्‍या सरकारला धडा शिकवा, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मधुकर कुकडे यांच्याप्रचारार्थ तिरोडा तालुक्यातील अर्जुनी,पालडोंगरी, कवलेवाडा,मुंडीकोटा, नवेझरी, वडेगाव, सुकडी येथे आयोजित सभेत
नागरिकांना संबोधित करताना बोलत होते.खासदार पटेल पुढे म्हणाले, विद्यमान सरकार सत्तेत येण्यापूर्वी जनतेला मोठमोठे आश्वासन दिले. मात्र साडेतीन वर्षाचा अवधी लोटत असताना सरकारने एकही आश्वसान पूर्ण केले नाही. या सरकारकडे आश्वासनाशिवाय जनतेसाठी काहीच नाही. ही सरकार शेतकरी, सर्वसामान्य विरोधी असून विविध योजनांच्या नावावर सर्वसामान्यांची दिशाभूल केली जात आहे.अशा सरकार जनतेची धडा शिकवून परिवर्तन आणावे, असेही त्यांनी व्यक्त केले. यावेळी माजी आमदार दिलीप बन्सोड, तालुकाध्यक्ष राधेलाल पटले, डॉ.योगेंद्र भगत, रमेश पारधी, पंचम बिसेन, राजलक्ष्मी तुरकर, प्रेमकुमार रहांगडाले, डॉ.अविनाश जायस्वाल आदि प्रामुख्याने उपस्थित होते.

सिरेगाव येथील भुषण डोंगरवार यांच्या निवासस्थानी लोकसभा निवडणुकी संदर्भात कार्यकर्त्यांची सभा नाना पटोले माजी खासदार, यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी प्रामुख्याने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे प्रदेश प्रतिनिधि मनोहर चंद्रिकापुरे, भागवत नाकाडे तालुका अध्यक्ष कांग्रेस पार्टी अर्जुनी, लोकपाल गहाणे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अर्जुनी मोर, गिरिष पालीवाल जी.प.सदस्य, भुवनदास डोंगरवार माजी सरपंच, नाजुक कुभंरे पं.स.सदस्य, आनंद जांभुळकर, रतीराम राणे तालुका अध्यक्ष किशान सभा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अर्जुनी मोर,शिशुकला हलमारे तालुका महिला अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अर्जुनी मोर, ईत्यादि मान्यवर उपस्थित होते.

पाटेकुर्रा येथील प्रेमलाल मेश्राम यांच्या निवासस्थानी लोकसभा निवडणुकी संदर्भात कार्यकर्त्यांची सभा मनोहर चंद्रिकापुरे प्रदेश प्रतिनिधि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. गजानन परशुरामकर संचालक, दिनेश कोरे अध्यक्ष युवक राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सड़क अर्जुनी, एफ.आर.टी.शाहा महासचिव किशान सभा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी,रजनी गिरेपुंजे तालुका महिला अध्यक्ष, छाया चव्हाण माजी जि.प.उपाध्यक्ष, सुधाकर पंधरे पं.स.सदस्य,रुपविलाश कुरसुंगे, सविता बिसेन सरपंच, यावेळी भारतीय कांग्रेस पार्टी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी आर.पी.आय.पी.री.पा. चे लेकिराम राहंगडाले, नीलकंठ कवरे, तुलाराम बिसेन, सोमजी उइके,प्रेमलाल मेश्राम, सोमजी चाकाटे, डॉ. राहंगडाले, प्रकाश मेश्राम, मुकुंदा पारधी, दुलीराम कवरे,बाबूलाल भंडारे, गनुजी कृष्णा, टीकाराम कवरे, अंजू बलसंवार, देवेंद्र बलसंवार, गीताबाई कवरे, उर्मिला कवरे, प्रमिला टेंभरे,ईत्यादि मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version