Home राजकीय राष्ट्रीय समाज पक्षाची जिल्हा कार्यकारीणी गठीत

राष्ट्रीय समाज पक्षाची जिल्हा कार्यकारीणी गठीत

0
वाशिम,दि.10ः-  केवळ राज्यातच नव्हे तेरा राज्यात आपले पाय रोवणार्या राष्ट्रीय समाज पक्षाची वशिम जिल्हा कार्यकारणी आज (दि.१०) शासकिय दुध संकलन केंद्रासमोरील हॉटेल बालाजी येथे पार पडलेल्या सभेत नव्याने गठीत करण्यात आली. यामध्ये  जिल्हा उपाध्यक्ष म्हणून प्रमोद खडसे, राजू बोरकर यांची निवड करण्यात आली. यावेळी इतरही पदाधिकाNयांची निवड करण्यात आली. राष्ट्रनायक तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे सुप्रिमो  पशुसंवर्धन , दुग्ध व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर  यांचे विचार समाजातील सर्व स्तरापर्यत पोहचविण्यायाठी आपण कटिबध्द असल्याचे विचार नव्याने गठीत करण्यात आलेल्या नवनियुक्त  पदाधिकाNयांनी व्यक्त केले.
या सभेला राष्ट्रीय समाज पक्षाचे उपाध्यक्ष सुभाषजी राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते राजपूत साहेबांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सर्वानुमते वाशिम जिल्हा उपाध्यक्ष म्हणून प्रमोद खडसे, राजू बोरकर यांची निवड करण्यात आली. तसेच  शहर महिला आघाडी प्रमुख वंदना भगत, बहुजन सेलचे जिल्हाध्यक्ष  म्हणून विष्णू कांबळे यांची निवड करण्यात आली. राष्ट्रनायक तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे सुप्रिमो  पशुसंवर्धन , दुग्ध व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर , महासचिव बाळासाहेब डोडकले, प्रदेश उपाध्यक्ष सुभाष राजपूत यांचे विचार  समाजातील शोषित , वंचित   सामान्य जनतेपर्यत पोहचवून शोषित, पिडीत जनतेला न्याय मिळवून देण्याची महत्वाची भुमिका  राबवू असे विचार नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाNयांनी मांडले. या वेळी रासपचे नेते ज्ञानेश्वर मुखमाले, प्रमोद खडसे, राजूभाउ आरु, विष्णू कांबळे, रामदास शिंदे, स्वप्निल कांबळे, डॉ. देवानंद गायकवाड, संतोष आरु, सुधाकर डोहळे, विठलराव गिलवरकर, नागेश गावंडे, संतोष पातळे, नाडोराव डाळ आदींची उपस्थिती होती.

Exit mobile version