Home राजकीय सत्तेवर येताच धानाचे मूल्य अडीच हजार रुपये करू-शरद पवारांची पत्रपरिषदेत माहिती

सत्तेवर येताच धानाचे मूल्य अडीच हजार रुपये करू-शरद पवारांची पत्रपरिषदेत माहिती

0

गोंदिया,दि.23- पुर्व विदर्भातील गोंदिया,भंडारा,गडचिरोली व चंद्रपूर जिल्हे हा राज्यात धानाचे कोठार म्हणून ओळखल्या जातात.त्यातच,नागपूर,भंडारा, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या मध्यप्रदेश व छत्तीसगढ राज्यात धान्याचे भाव प्रति क्विंचल अडीच हजार रूपये आहे. मात्र, गोंदिया,भंडारा,चंद्रपूर,गडचिरोली जिल्ह्यात १७४० रूपये धानाला भाव आहे. त्यासोबत अद्यापही भाजपा शासनाने धानाला बोनस जाहीर केला नाही. ही एकप्रकारे शेतकºयांची थट्टाच असून मुख्यमंत्री विदर्भातले असतानासुद्धा विदर्भात धानाला भाव नाही ही मोठी शोकांतिका असून आम्ही सत्तेवर येताच धानाचे भाव अडीच हजार रूपये करणार असल्याची घोषणा राष्ट्वादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी आज २३ डिसेंबर रोजी पत्रपरिषदेत केली.

पत्रपरिषदेत पूढे पवार म्हणाले, यंदा राज्यातील मराठवाडा,विदर्भ,पश्चिम महाराष्टातील जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असून राज्य सरकारच्यावतीने सर्वे केला. मात्र,विदर्भात सर्वे का केला नाही. राज्य सरकार जसे सांगेल त्याच ठिकाणी सर्वे करणारी टिम जात जाते. मराठवाड्यात चक्क अंधार झाल्यानंतर टीम दुष्काळीस्थितीची पाहणी केली. दुष्काळबाबद राज्य सरकार गंभीर नाही. तेव्हा आम्ही संसदेचे हिवाळी अधिवेशन सुट्या संपताच सुरु होताच हा मुद्दा मांडणार असून यावरही सरकारने हा शेतकºयांचा मुद्दा गंभीरतेने घेतले नाही तर, रस्त्यावर उतरण्याचा इशारा पवारांनी देत २०१९ मध्ये नक्किच सत्ता परिवर्तन होईल असा आशावाद व्यक्त केला. सध्या सत्तेत असलेल्या भाजपने स्वतंत्र विदर्भ देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, सत्तेत आल्यानंतर विदर्भच्या मुद्द्याला बगल दिली.आमचा पक्ष विदर्भातील जनता ज्या दिवशी म्हणेल त्या दिवसापासून आम्ही त्यांच्यासोबत आहोत असेही पवार म्हणाले. देश आणि राज्यात शेतकरी नापिकी, अवकाळी पाऊस आणि शेतमालाला कमी दर यामुळे आत्महत्या करत आहेत. परंतु, मोदी सरकारच्या मंत्र्यांनी २०१६ पासून आपल्याकडे शेतकरी आत्महत्येची माहिती उपलब्ध नसल्याची संसदेत सांगितले. मी स्वत:हा केंद्रात कृषी मंत्री राहिलो आहे, आत्महत्या झाली की, त्याची नोंद सरकारच्या यंत्रणेच्यावतीने करण्यात येते.यात शेतकरी आत्महत्याच नव्हे तर आत्महत्येच सर्वच प्रकाराची नोंद करण्यात येते. परंतु, भाजपने आपले पाप लपविण्यासाठी आकडेवारीच नसल्याचे सांगून दिशाभूल केली आहे.

येत्या निवडणुकात कॉंग्रेससोबत आघाडी होणार असून शेकाप व डाव्या पक्षांना राज्यात आघाडीत सहभागी करणार आहोत.आतापर्यंत ४० जागांवर एकमत झाले आहे तर, ८ जांगाचा निर्णय दोन तीन दिवसात होईल. असे त्यांनी सांगितले.त्यातच प्रधानमंत्री कुणाला बनवायचे हा विषय नंतरचा आहे.2004 मध्ये आम्ही सर्व स्वतंत्र लढलो त्यानंतर महागठबंधन करीत मनमोहन सिंह यांना प्रधानमंत्री केले आणि 10 वर्ष ते या पदावर राहिले.तसेच 2019 च्या निवडणुकीत सुध्दा आम्ही करु.ज्या राज्यात ज्यां राजकीय पक्षाची ताकद आहे,त्या पक्षाला मोठ्या पक्षाने आधी प्राधान्य द्यावे ही आमची भूमिका असल्याचे पवार म्हणाले.

खालच्या स्तराची भाषा बोलणारे पहिले पंतप्रधान
पंतप्रधान हे पद लोकशाहीत वरच्या स्तराचे आहे. देशाच्या स्वतंत्र्यानंतर एकाही पंतप्रधानाने त्या पदाची अवमानना होईल असे भाष्य केले नव्हते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदाची गरीमा न ठेवता महिला आणि इतरांवर वैयक्तिक भाष्य करून त्या पदाची अवमानना केली. हे त्यांना शोभणारे नाही. येत्या ५ ते ६ महिन्यात निवडणुका लागणार आहेत. आता देशातील जनता या खोटे बोलणाºया सरकारला कंटाळले आहेत. त्यामुळे सत्ता बदल होणार आहे. जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देणार आहे.

आता सल्ला घेणे झाले बंद
पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरुवातीला मी शरद पवार यांचा सल्ला घेतो असे म्हणत होते. यावर पत्रकारांनी शरद पवार यांना विचारणा केली असता सुरुवातीच्या एक ते दीड वर्षापर्यंत ते अधुन-मधून फोन करायचे. मात्र, आता माझा सल्ला तर सोडा स्वत:च्या पक्षातील खासदार आणि मंत्र्यांना देखील जुमानत नाही. यावरून त्यांच्या कार्यकुशलतेचा अंदाज येतो, असेही पवार म्हणाले.

Exit mobile version