Home राजकीय राफेल घोटाळ्याची चौकशी करा-काँग्रेसचे आंदोलनासह निदर्शने

राफेल घोटाळ्याची चौकशी करा-काँग्रेसचे आंदोलनासह निदर्शने

0

गोंदिया,दि.24ः- केंद्र सरकारने राफेल विमान खरेदीत घोटाळा केला आहे.या घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीतर्फे चौकशी व्हावी. या मागणीसाठी काँग्रेसचे देशभर धरणे आंदोलन सुरू आहेत.त्याअंतर्गत आज विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात काँग्रेसच्यावतीने आंदोलन करुन निवेदन सादर करण्यात आले.गोंदिया येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करुन सरकारचा निषेध नोंदवित राफेल घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.गोंदिया जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या आंदोलनात आमदार गोपालदास अग्रवाल,जि.प.अध्यक्ष सीमा मडावी,सभापती रमेश अंबुले,लता दोनोडे,माजी सभापती पी.जी.कटरे,आदिवासी नेते नामदेवराव किरसान,माजी मंत्री भरतभाऊ बहेकार,जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष उषा शहारे,डॉ.योगेंद्र भगत,राधेलाल पटले,प्रदेश काँग्रेससचिव विनोद जैन,माजी जि.प.अध्यक्ष अ‍ॅड.के.आर.शेंडे,जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष डॉŸझामसिह बघेले,सहेसराम कोरेटे,माधुरी हरिणखेडे,राजेश नंदागवळी,माजी आमदार रामरतन राऊत,धनलाल ठाकरे,चुन्नीलाल बेंदरे,विमल नागपूरे,हरिष तुळसकर,आलोक मोहंती,उषा मेंढे,गिरिष पालीवाल,ओमप्रकाश भक्तवर्ती,सरिता कापगते,दिपक पवार,लोकसभा युवक काँग्रेस माजी अध्यक्ष प्रफुल अग्रवाल,बंटी बानेवार,डेमेंद्र रहागंडाले,प्रकाश रहमतकर,संदिप भाटिया,सरिता अंबुले,स्नेहा गौतम,न.प.सभापती शकील मंसुरी,सुनिल तिवारी,सुनिल भालेराव,राकेश ठाकूर,देवा रुसे,भागवत मेश्राम,निशांत राऊत,सुशिल रहागंडाले,कुर्मराज चौव्हान,चिकू अग्रवाल आदी कार्यकर्ते व पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते.

अकोलाः-येथेही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणा देत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. केंद्र सरकारने राफेल विमान खरेदीमध्ये ४१ हजार कोटी रुपयांच्या घोटाळा केला असून याची संयुक्त संसदीय समितीतर्फे चौकशी करण्यात यावी. अशी मागणी अकोला काँग्रेसतर्फे करण्यात आली. आज या मागणीसाठी काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.केंद्र सरकारने राफेल विमान खरेदीत घोटाळा केला आहे. या घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीतर्फे चौकशी व्हावी. या मागणीसाठी काँग्रेसचे देशभर धरणे आंदोलन सुरू आहेत. अकोला मध्येही हे आंदोलन महानगराध्यक्ष बबनराव चौधरी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणा देत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.आंदोलनात महानगरपालिका विरोधी पक्ष नेता साजिद खान पठाण, माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, माजी नगरसेविका पुष्पा गुलवाडे, नगरसेवक मोहम्मद इरफान, अजाबराव टाले, माजी उपमहापौर निखिलेश दिवेकर यांच्यासह काँग्रेसचे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version