Home राजकीय अजित पवारांनी घेतली भाजप नेते फुंडकर यांच्या परिवाराची भेट

अजित पवारांनी घेतली भाजप नेते फुंडकर यांच्या परिवाराची भेट

0

बुलढाणा,दि.21 : लोकनेते दिवंगत भाऊसाहेब फुंडकर यांच्या परिवाराची शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसनेते अजित पवार, धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी खामगाव येथे भेट घेऊन कौटुंबिक जिव्हाळ्याचा परिचय आणून दिला. यावेळी भाऊसाहेब फुंडकर यांचे पुत्र आमदार आकाश फुंडकर व सागर फुंडकर यांचे त्यांनी सांत्वन केले.

निर्धार यात्रेसाठी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीची नेतेमंडळी शनिवारी बुलडाणा जिल्ह्यात होती. यावेळी त्यांनी आवर्जून फुंडकर परिवाराची भेट घेतली. अजित पवार यांनी भाऊसाहेब फुंडकर यांच्यात पक्षविरहीत नाते जोपासत गेले होते. भाऊसाहेब फुंडकर याच्या आठवणींना आमदार आकाश फुंडकर, सागर फुंडकर यांच्यासोबत चर्चा करत उजाळा दिला.अजित पवार यांनी दिवंगत फुंडकर यांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन आपण कायम फुंडकर परिवारासोबत असल्याचे अभिवचनच यावेळी दिले. त्यांच्या सोबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे होते.

Exit mobile version