Home राजकीय राष्ट्रवादी काँग्रेसने भजन किर्तन करु केला रस्ता रोको आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेसने भजन किर्तन करु केला रस्ता रोको आंदोलन

0

गोंदिया,दि.17ः-तालुक्यातील विविध समस्या व प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी, १६ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मुंडीपार बसस्थानकासमोर भजन पुजन किर्तन करुन रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकार्‍यांमार्फत शासनाला देण्यात आले.
माजी आमदार राजेंद्र जैन, दिलीप बंसोड, जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन, म्हाडाचे माजी सभापती नरेश माहेश्‍वरी, राजलक्ष्मी तुरकर यांच्या नेतृत्वात भजन, कीर्तन करीत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनासाठी समस्यांना वाचा फोडणारी भजने सुध्दा तयार केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या अनोख्या आंदोलनाने या मार्गावरुन ये-जा करणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. आंदोलनानंतर विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांना देण्यात आले.
या वेळी दिलेल्या निवेदनातून खैरबंदा जलाशयात धापेवाडा उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडून शेतकऱ्यांना सिंचनासाठी देण्यात यावे, शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करा, पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी बियाणे वाटप करण्यात यावे, कृषी पंपासाठी शेतकºयांना लागू केलेली सौरपंपाची अट रद्द करावी, एम.आय.डी.सी.तील टीम फॅरो प्रकल्प बंद पडला असल्याने येथे कार्यरत मजूर बेरोजगार झाले असून त्यांना रोजगार उपलब्ध करु द्यावा, संग्रामपूर, हरि तलाव, रानी तलावात खैरबंदा जलाशयातून पाईप लाईनच्या माध्यमातून उर्ध्वनलिका तयार करुन पाणी सोडण्यात यावे, दवनीवाडा तालुका तयार करण्यात यावा, सहेसपूर येथील शेतकºयांना खैरबंदा जलाशयाचे पाणी देण्यात यावे, साईटोला रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी, पागंडी जलाशयाच्या माध्यमातून डोंगरगाव, मुंडीपार, सेजगाव, भानपूर येथील शेतकºयांना सिंचनासाठी नियमित पाणी देण्यात यावे, घरकुल लाभार्थ्यांना थकलेले हप्ते त्वरीत देण्यात यावे, धापेवाडा, लोधीटोला, येथे वैनगंगा नदीच्या काठालगत सुरक्षा भिंतीचे बांधकाम करण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाच्या नेतृत्त्वात उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांना देण्यात आले.
आंदोलनात तालुकाध्यक्ष बाळकृष्ण पटले, प्रेमकुमार रहांगडाले, जितेश टेंभरे, नितीन टेंभरे, कैलाश पटले, प्रदीप रोकडे, अशोक डोंगरे, गोविंद बावनकर, हितेशकुमार पताहे, चेतना पटले, सविता टेंभरे, हेमलता बारेवार, सुनिता डोंगरे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह परिसरातील शेतकरी सहभागी झाले होते.

Exit mobile version