Home Top News सरंक्षणमंत्री मनोहर पर्रीकरची पुलगांवला भेटः हॉस्पिटलला जाऊन जखमींची केली विचारपूस

सरंक्षणमंत्री मनोहर पर्रीकरची पुलगांवला भेटः हॉस्पिटलला जाऊन जखमींची केली विचारपूस

0

वर्धा,दि.३१-पुलगाव येथील दारुगोळा भांडाराला सोमवार दि. ३० मे २०१६ रोजी मध्‍यरात्री दीड वाजेच्‍या सूमारास अचानक आग लागून मनुष्‍य हानी व वित्‍त हानी झाली.

या घटनेचा आढावा घेण्‍यासाठी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी घटनास्‍थळाला व सावंगी मेघे येथील हॉस्पिटलमध्‍ये उपचार सुरु असलेल्‍या जखमींची विचारपूस करुन माहिती जाणून घेतली.
यावेळी बोलतांना ते म्‍हणाले की, या स्‍फोटात एकूण १६ जणांचा मृत्‍यु झाला. त्‍यात दोन लष्‍करी अधिकारी तर १३ अग्निशमन दलाचे फायरमन आहेत. शिवाय एका जवानांचा त्‍यात समावेश तर १७ आहे. स्‍फोटाची घटना घडल्‍यानंतर अग्निशमन अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्‍थळी पोहचले. आग विझवतांना त्‍यांना प्राणास मुकावे लागले. या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्‍थांमध्‍ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
जिल्‍हा प्रशासनाने या घटनेचे गांभीर्य पाहून योग्‍य ती खबरदारी घेतली, शिवाय ग्रामस्‍थांना सुरक्षित स्‍थळी हलविले. आता संपूर्ण परिस्थिती आटोक्‍यात असल्‍याचेही सरंक्षणमंत्र्यांनी सांगितले.

Exit mobile version