Home Top News मध्य इटलीला भूकंपाचा जोरदार धक्का

मध्य इटलीला भूकंपाचा जोरदार धक्का

0
रोम – मध्य इटलीला आज (रविवार) सकाळी जोरदार भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपामुळे अनेक ठिकाणी इमारती कोसळल्या असून, अद्याप जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही.
 
भूगर्भशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी बसलेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.6 इतकी मोजण्यात आली आहे. रोममधील काही इमारतींना गेल्या आठवड्यातच बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यामुळे तडे गेले होते. आता पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का बसल्याने इमारती कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. सुरवातीला 7.1 तीव्रतेचा आणि नंतर 6.6 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. 
 
ऑगस्टमध्ये मध्य इटलीला बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यात 300 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा एकदा याच भागाला भूकंपाचा धक्का बसला आहे.

Exit mobile version