Home Top News आश्रमशाळेच्या तपासणीत आढळले निकृष्ठ अन्न व शिक्षणाची घसरलेली गुणवत्ता

आश्रमशाळेच्या तपासणीत आढळले निकृष्ठ अन्न व शिक्षणाची घसरलेली गुणवत्ता

0

अनु.जमाती कल्याण समिती दौèयात भाजपविरोधी नेत्यांच्या आश्रमशाळा रडारवर
शासकीय व भाजपनेत्यांच्या आश्रमशाळांना समितीचा अभय

खेमेंद्र कटरे
गोंदिया,दि१९ः-महाराष्ट्र विधानमंडळाच्या (आदिवासी)अनुसूचित जमाती कल्याण समितीने आज शुक्रवारला गोंदिया जिल्ह्यातील शासकीय व खासगी आश्रमशाळासोंबतच प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली.आदिवासी विभागाच्यावतीने राबविण्यात आलेल्या योजनांच्या कामावर भेट दिली.मात्र समितीचा हा पाहणी दौरा फक्त दौराच ठरला असून आश्रमशाळांच्या तपासणीत समितीच्या सदस्यांनी ज्यापध्दती तपासणीसाठी शाळा निवडल्या त्यावरुन त्या समितीच्या मनात राजकीय आकस असल्याचे दिसून आले.सोबतच शासकीय आश्रमशाळा व वस्तीगृहातील समस्यांकडे कानाडोळा करण्यासारखाच हा दौरा ठरला.या समितीकडून अनेकांना अपेक्षा होत्या,त्या फोल ठरल्या.
महाराष्ट्र विधानमंडळाच्या १५ सदस्य असलेल्या समितीपैकी आलेल्या ११ सदस्यांच्या दोन चमू तयार करण्यात आल्या.त्यापैकी एक चमू समितीचे अध्यक्ष डॉ.अशोक उईके यांच्या नेतृत्वात समितीचे सदस्य आमदार सर्वश्री प्रभुदास भिलावेकर, पास्कल धनारे, पांढूरंग बरोरा, आनंद ठाकुर, श्रीकांत देशपांडे व जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे या चमूने गोंदिया,आमगाव, सालेकसा व देवरी तालुके तर आमदार संजय पुराम यांच्या नेतृत्वातील आमदार वैभव पिचड,अमित घोडा,डॉ.संतोष टारफे,शांताराम मोेरे यांच्या चमूने गोरेगाव,सडक अर्जुनी,अर्जुनी मोरगाव व देवरी तालुक्यातील आश्रमशाळांसह इतर ठिकाणी भेटी दिल्या.विशेष म्हणजे शेंडा,पुराडा,जमाकुडो यासारख्या शासकीय आश्रमशाळांमध्ये अव्यवस्था,मुलींना झोपण्यासाठी पलंगाची सोय नाही.खिडक्यांच्या काचा तुटलेल्या अशा आश्रमशाळांना मात्र तपासणी समितीने वगळले.सालेकसा तालुक्यातील पिपरीया येथील कचारगड खासगी आश्रमशाळेची पाहणी केली.
अनुसूचित जमाती कल्याण समितीने पिपरिया शाळेला भेट देतांना आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्याथ्र्यांच्या निवास खोल्या, संगणक कक्ष, स्नानगृह, स्वयंपाक घर, शौचालयाची व शाळेच्या परिसरात असलेल्या विहिरीची पाहणी केली. इयत्ता १० व्या वर्गाला भेट देवून विद्याथ्र्यांशी संवाद साधला. विद्याथ्र्यांना त्यांनी गणित तसेच सामान्य ज्ञान या विषयावरील प्रश्न विचारले. मार्चमध्ये होणाèया १० वीच्या परीक्षेची तयारी कुठपर्यंत झाली आहे याची विचारणा देखील विद्याथ्र्यांना समितीच्या सदस्यांनी केली. संगणक कक्ष,मुलींचे वस्तीगृह,भोजन कक्षासह शाळेच्या रेकार्डची तपासणी केली.या शाळेत मात्र जेव्हा समितीचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी हे वर्गात पोचले तेव्हा १० वीच्या विद्याथ्र्यांना ६६/६ किती होतात हे सांगता आले नाही.तर एका शिक्षकाला सुध्दा ११११/११ किती होतात हे विचारले असता त्या शिक्षकांने त्याचे समाधानकारक उत्तर दिले नाही.धाबेपवनी येथील आश्रमशाळेत विद्याथ्र्यांना निकृष्ठ जेवण दिले जात असल्याचा शेरा समितीने ठेवत अन्नपुरवठा विभागाच्या निरिक्षकाला शाळेतील चना,गहू,तुळदाळ आदींचे शॅम्पल गोळा करुन उद्यापर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्दश दिले.इळदा येथील शासकीय आश्रमशाळेत मात्र समितीला सर्व चांगले दिसले फक्त संगणक कक्षाचा वापर होत नसल्यानेच धुळ साचल्याची टिका केली.सुत्राकंडून मिळालेल्या माहितीनुसार समितीच्या दौèयात जमाकुडो व पुराडा येथील आश्रमशाळेला भेट देण्याचे नियोजन होते,परंतु ते नियोजन का बदललले गेले हे कुणालाच कळले नाही.समितीने भेट दिलेली पिपरीया आश्रमशाळा ही माजी राज्यमंत्री भरतभाऊ बहेकार यांची तर धाबेपवनी येथील आश्रमशाळा ही माजी मंत्री प्रा.महादेवराव शिवणकर यांच्या संस्थेची आहे.
समितीचे सदस्य आमदार सर्वश्री वैभव पिचड, संतोष तारफे, संजय पुराम, शांताराम मोरे व अमीत घोडा यांनी अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील आदिवासी भागातील पर्यटनस्थळ म्हणून विकसीत होत असलेल्या नवेगावबांध जलाशयाची पाहणी केली. यावेळी दौèयात समिती सदस्यांसोबत जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी उपस्थित होते. या परिसरात करण्यात येत असलेल्या विकास कामांची माहिती वन विकास महामंडळ व वन विभाग यांच्याकडून घेतली. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देवून विविध विभागाची पाहणी केली. तेथे आलेल्या व उपचार घेत असलेल्या रुग्णांची व वैद्यकीय अधिकारी, कर्मचाèयांशी संवाद साधून येणाèया अडचणी व रुग्णालयात असलेल्या गैरसोयीबाबतची विचारणा समितीच्या सदस्यांनी वैद्यकीय अधिकाèयांना केली. त्यानंतर त्यांनी इळदा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेला भेट देवून विद्याथ्र्यांना देण्यात येणाèया सोयीसुविधा बाबतची पाहणी करुन आढळून आलेल्या उणिवांबाबतची विचारणा आश्रमशाळेच्या अधीक्षक व मुख्याध्यापकांना केली. तसेच विद्याथ्र्यांशी देखील चर्चा केली.देवरी तालुक्यातील चिचगड ग्रामीण रुग्णालयाला भेट देवून रुग्णांशी व त्यांच्या नातेवाईकांशी चर्चा करुन त्यांना देण्यात येत असलेल्या सुविधांबाबतची माहिती जाणून घेतली. यावेळी संबंधित यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version