Home Top News कर्नाटकात मोदी लाट; भाजप सर्वांत मोठा पक्ष

कर्नाटकात मोदी लाट; भाजप सर्वांत मोठा पक्ष

0

बंगळूर,दि.15 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराचा धुरळा उडवून प्रतिष्ठेची बनविलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपने बाजी मारल्याचे चित्र आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या कर्नाटक विधानसभेच्या निकालातून कर्नाटकमध्ये मोदी लाट असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना हा मोठ्ठा धक्का मानला जात आहे. सुरवातीच्या मतमोजणीनुसार जनता दल (सेक्युलर) (जेडीएस) हा पक्ष किंग मेकरच्या भूमिकेत असला तरी भाजप मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. त्यामुळे जेडीएसच्या मदतीने सरकार स्थापन करावे लागणार आहे. कर्नाटकमध्ये २२४ पैकी २२२ मतदार संघांसाठीची आज (ता. १५) सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीस सुरवात झाली. सुरवातीच्या मनमोजणीनुसार काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर पहायला मिळली. मात्र, नंतर भाजपने जोरदार मुसंडी मारत काँग्रेसला मागे टाकले. जेडीएसची भूमिका महत्त्वाची असणार आहे. आतापर्यंत जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार भाजप 107, काँग्रेस 67, आणि जेडीएस आणि इतर 47 जागांवर आघाडीवर आहेत.

Exit mobile version