Home Top News छत्तीसगड च्या दोन इसमांची नक्षल्यांकडून एटापल्ली तालुक्यात हत्या

छत्तीसगड च्या दोन इसमांची नक्षल्यांकडून एटापल्ली तालुक्यात हत्या

0

गडचिरोली,(अशोक दुर्गम)दि.०२: सशस्त्र नक्षल्यांनी आज मध्यरात्री छत्तीसगडमधील दोन इसमांची धारदार शस्त्राने गळा चिरुन हत्या केली. ही घटना एटापल्ली तालुक्यातील जांभिया गट्टा उपपोलिस अंतर्गगत ताडगुडा मार्गावर घडली. सोनू पदा(35)व सोमजी पदा(40)दोघेही रा.उलिया, बांदे, छत्तीसगड अशी मृतांची नावे आहेत.

सशस्त्र नक्षलवादी सोनू पदा व सोमजी पदा यांच्या गावी गेले. त्यांना झोपेतून उठवून बाहेर नेले व नंतर त्यांची शस्त्राने गळा कापून हत्या केली. नक्षल्यांनी दोघांचेही मृतदेह गट्टा उपपोलिस ठाण्यापासून उत्तरेस १ किलोमीटर अंतरावर असलेल्या ताडगुडा मार्गावर फेकून ठेवले. आज सकाळी दोघेही मृतावस्थेत आढळून आले. पोलिस खबऱ्या बनून पार्टी आणि जनतेला चुकीची माहिती देत असल्याने त्यांना शिक्षा देण्याचा निर्णय घेतल्याचे पत्रकात उल्लेख केला आहे.

Exit mobile version