Home Top News ब्राम्होस प्रकल्पावर काम करणारा शास्त्रज्ञ ताब्यात; एटीएसची कारवाई

ब्राम्होस प्रकल्पावर काम करणारा शास्त्रज्ञ ताब्यात; एटीएसची कारवाई

0

नागपूर,दि.08 – येथील ब्राम्होस युनिटमध्ये काम करणाऱ्या एका शास्त्रज्ञाला हेरगिरीच्या संशयावरून उत्तर प्रदेश एटीसने ताब्यात घेतले आहे. निशांत अग्रवाल असे त्याचे नाव आहे. नागपूरच्या उज्वल नगर येथे मनोहर काळे यांच्या घरी तो भाड्याने राहत असल्याची माहिती समोर आली आहे.नागपुरमध्ये येण्याअगोदर निशांत हैदराबाद येथे कार्यरत होता. निशांत हा डिफेंस रिसर्च अॅण्ड डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशनमध्ये बुटीबोरी युनिटमध्ये शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहे. नागपूर पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. ४ महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न झाल्याची माहिती आहे.

Exit mobile version