Home Top News अाता अॅपवरून मिळेल रेल्वेचे जनरल तिकीट; मध्य रेल्वेची घोषणा

अाता अॅपवरून मिळेल रेल्वेचे जनरल तिकीट; मध्य रेल्वेची घोषणा

0

नागपूर,दि.13ः- मोबाइल अॅपवरून प्रवाशांना रेल्वे प्रवासाचे अनारक्षित कॅशलेस तिकीट बुक करता येणार आहे. मध्य रेल्वेने गुरुवारी याबाबत घोषणा केली असून ही सुविधा शुक्रवारपासून लागू होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. रेल्वे प्रवाशांना ही सुविधा उपलब्ध करण्यासाठी सेंटर फॉर रेल्वे इन्फर्मेशन सिस्टिम (क्रीस) ने यूटीएस हे अनारक्षित तिकीट अॅप सुरू केले आहे.या यूटीएस मोबाइल अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना पॅसेंजर गाड्यांसह मेल तसेच एक्स्प्रेस गाड्यांची अनारक्षित तिकिटेही बुक करता येणार आहेत. यूटीएस मोबाइल अॅपमधून प्रवाशांना आर-वॉलेट रिचार्जवर पाच टक्के बोनसही मिळणार आहे. या सुविधेसाठी प्रवाशांना विंडो, अँड्रॉइड किंवा आयओएस आधारित मोबाइलवर यूटीएस अॅप्लिकेशन डाऊनलोड करावे लागेल. या अॅपवर आर-वॉलेट, पेटीएम, मोबाक्विकच्या माध्यमातून तिकीट खरेदी करता येईल. यूटीएस अॅप्लिकेशनवर लॉगइन करताना आपले शहर, मार्ग तसेच गंतव्य स्थान निवडावे लागणार आहे. त्यानंतर आर-वॉलेटच्या माध्यमातून पेमेंट करावे लागेल, असे मध्य रेल्वेने नमूद केले आहे.

Exit mobile version