Home Top News आमदाराच्या ताफ्यावर नक्षलवाद्यांचा हल्ला, पाच जवान गंभीर जखमी

आमदाराच्या ताफ्यावर नक्षलवाद्यांचा हल्ला, पाच जवान गंभीर जखमी

0

रायपूर,दि.09(वृत्तसंस्था) – देशभरात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर असतानाचा नक्षलवाद्यांनी एक मोठा हल्ला घडवून आणला आहे. छत्तीसगडमधील नक्षल प्रभावित दांतेवाडा भागात नक्षलवाद्यांनी भाजपा आमदार भीमा मांडवी यांच्या ताफ्याला लक्ष्य करून हल्ला घडवून आणला. नक्षलवाद्यांनी ताफ्याला लक्ष्य करून आयईडीद्वारे घडवलेल्या स्फोटात पाच जवान गंभीर जखमी झाले आहेत.

Exit mobile version