Home Top News सेवानिवृत्त वनधिकार्याच्या घरी आढळेल बिबट्याच कातडे

सेवानिवृत्त वनधिकार्याच्या घरी आढळेल बिबट्याच कातडे

0

भंडारा,दि.08 :भंडारा जिल्ह्याते गेल्या आठवड्यापासून वाघ व बिबट्याच्या शिकारीचा मुद्दा गाजत असतानाच नुकतेच वनविभागातून राऊंड आफिसर म्हणून सेवानिवृत्त झालेल्या एका वनाधिकार्याच्या घरून बिबट्याचे कातडे सापडल्याने वनविभागातच खळबळ माजली आहे. मोहाडी तालुक्यातील जांब (कांद्री) येथील सेवानिवृत्त राऊंड आॅफीसर देवेंद्र चकोले यांच्या घरी बिबट्याचे कातडे सामान अन्यत्र हलविताना उघडकीस आले.चकोल हे आठ दिवसापुर्वीच वनविभागातून सेवानिवृत्त झाले होते.याप्रकरणाची माहिती मिळताच उपवनसरंक्षक विवेक होशींग हे चकोले यांच्या घरी दाखल झाले असून अधिक तपास सुरु करण्यात आल्याची माहिती वनविभागाच्या सुत्रांनी दिली आहे.

Exit mobile version