Home विदर्भ कायदा व सुव्यवस्था अबादित ठेवण्याचा प्रयत्न करणार

कायदा व सुव्यवस्था अबादित ठेवण्याचा प्रयत्न करणार

0

सिरोंचा ,दि.11- तालुका हा तीन राज्याच्या सीमेवर असलेला तालुका आहे. या भागात नागरिकांच्या सहकार्याने कायदा व सुव्यवस्था अबादित ठेवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांनी केले.
उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांनी सिरोंचा उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला. यापूर्वी त्यांनी अमरावती ग्रामीण प्रोपेशन पिरेड काढत सेवा केली होती. आज सिरोंचातील सर्व पत्रकारांचा परिचय म्हणून उपविभागीय कार्यालयात त्यांनी बैठकीचे आयोजन केले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी जेष्ठ पत्रकार महेश तिवारी, मोहम्मद इरफान, वेंकटेश दुडमवार, रोमित तोंबलार्वार, पोलीस निरीक्षक विलास सुपे, सतीश राचलार्वार, नागभूषनम चकिनारपूवार, नरेश धर्मपुरीवार, शाम दुलम, अमित तिप्पटी, संतोष ताटीकोंडावार, सुरेश तिप्पटीवार, वसंत तोकला, मुरली जिलेला, उज्वल तिवारी, श्याम बेज्जनीवार, माजिद अली, मेहराज खान उपस्थित होते.

Exit mobile version