Home विदर्भ विषमतावादी समाजामुळेच शिक्षित मुलींच्या आत्महत्यामध्ये वाढ-प्रा. चव्हाण

विषमतावादी समाजामुळेच शिक्षित मुलींच्या आत्महत्यामध्ये वाढ-प्रा. चव्हाण

0

शिक्षण परिषदेतील सुर
गोंदिया,दि.02 : माणसाकडे विचार करण्याची क्षमता आहे. क्षमता म्हणजेच विवेक होय. चिकित्सा ही करु शकते. प्रश्न ही विचारु शकते. परंतु विषमतावादी समाजामुळेच शिक्षित मुलींच्या आत्महत्यामध्ये वाढ होत आहे. बहुजन समाजातील गाव खेड्यातील युवक शिक्षणात पुढे येऊ लागला. शिक्षीत होवू लागल्याचे बघून सरकारने शिक्षणाच्या मुलभूत अधिकाराला बाजूला सारत भांडवलदारांच्या शिक्षण संस्था सुरु केलेल्या  क्लासेसमुळे बहुजन समाजातील लोकांची आर्थिक कोंडी होवू लागल्याचे विचार स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठाचे इंग्रजी भाषा प्रमुख प्रा. दिलीप चव्हाण यांनी व्यक्त केले. ते छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिले वैदीक राज्याभिषेक झुगारून २४ सप्टेंबर १६७४ दुसरा शाक्त राजाभिषेक करून रयतेचे शेतकèयांचे राज्य निर्माण केले. त्या दिवसाची आठवण म्हणून महात्मा जोतिबा फुलेंनी २४ सप्टेंबर १८७३ ला सत्यशोधक समाजाची स्थापना करून शिक्षण प्रसारातून सत्यशोधक विचारांचा पायंडा घातला. अशा या स्थापना दिनाची आठवण रहावी, म्हणून शिक्षण अधिकार संघर्ष समिती गोंदियाच्या वतीने ३० सप्टेंबर रोजी स्थानिक पोवार सांस्कृतिक भवन कन्हारटोली येथे आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व शिक्षण परिषदल कार्यक्रमात बोलत बोलत होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस उपनिरिक्षक इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले.पहिल्या सत्रात संवैधानिक हक्क संरक्षण व सामाजिक न्यायच्या अंमलबजावणीसाठी स्पर्धा परीक्षा तयारीचे तंत्र यावर दिपक बहेकार, संचालन ब्लॅक ब्रिटिश अ‍ॅकडमी तसेच पुणेचे अभय लांडगे यांनी मार्गदर्शन केले.दुसèया सत्रात शिक्षण हक्क अधिनियम व समोरील आव्हाने यावर ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे,डॉ. दिलीप चव्हाण, रमेश बिजेकर यांनी मार्गदर्शन केले.अध्यक्षस्थानी ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष प्रा. बी.एम. करमकर होते.
प्रा.चव्हाण पुढे म्हणाले की, आज देशातीलच नव्हे तर आपल्या मराठवाडा विदर्भातील शिक्षित मुली ही आत्महत्या का करु लागल्या. हा चिंतनाचा विषय झालेला आहे. करिअर घडविताना सामाजिक व आर्थिक अडचणी नेहमीच समोर येतात. त्यातच आर्थिक, सामाजिक व राजकीय प्रश्नामुळे आपण कुठेतरी कमी पडत आहोत. गुणांच्या टक्केवारीने सर्वच प्रश्न सुटत नाहीत. जगात विषमता व जातीयतेची बिजे रोवली गेली. त्यामुळे आमची अवहेलना केली जाते आणि आमच्या विकासाच्या खूप कमी संधी अशा अवस्थेत मिळतात. बहूजनांच्या मुलांना शिक्षणापासून दुर ठेवण्यासाठीच विषमतावादी व जातीयतेला खतपाणी घालणाèया सरकारी धोरणांनी भांडलवादारांना लाभ पोहोचविण्यासाठी बुद्धयांकाची जाणीवपूर्वक निर्मिती केली गेली. ज्यामुळे मतभेद तयार होत आहेत. जगातील फिनलैंडमध्ये सर्वात चांगली शिक्षण पद्धती जगातली आहे. तिथे वयाच्या १४ वर्षापर्यंत कुठलीच परीक्षा घेतली जात नाही. परंतु भारतात कमालीचे दारिद्र्य असतानांही पहिल्या वर्गापासून मुलांच्या डोक्यावर स्पर्धात्मक परीक्षेचे ओझे ठेवून बहुजन समाजाला नामोहरण करण्याचे षङयंत्र रचले गेले आहेत.
यावेळी बोलताना सत्यशोधक समाजाचे राज्याध्यक्ष रमेश बिजेकर म्हणाले की, ज्यांच्या समान शिक्षण नाही त्यांच्यासाठी (मेडीकल व आभियांत्रिकी) पूर्व परीक्षा ही स्पर्धात्मक पूर्व परीक्षा एक कशी राहू शकते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या नावावर नोकèयामध्ये कपात करुन बेरोजगारी वाढविली जात आहे. गाव खेड्यातील युवकांना रोजगार व नोकरीची आवश्यकता असताना सरकार मात्र अदानी, अंबानी व टाटाच्या डिजीटल इंडियासाठी काम करते. त्यामुळेच भविष्यात महाराष्ट्रातील ८० हजार शाळा बंद होण्याच्या मार्गावर असल्याचे विचार त्यंनी व्यक्त केले.
स्पर्धा परीक्षेत आपल्याला सहभाग घ्यायचा असल्यास प्रथम प्राधान्य कशाला दयायचे हे ठरवून घ्यायचे आहे. ते करत असताना आपल्याला अभ्यास महत्वाचा की मोबाईल वरील व्हॉसटपचे संदेश हे ठरवायचे आहे. मी तुमच्या सारखाच सर्व सामान्य कुटुंबातून आलेला विद्यार्थी आहे. शिक्षणाच्या बाबतीत म्हणाले की एकदा कर्मवीर भाऊराव पाटलांच्या वडीलांनी आपल्या मुलाला कुठपर्यंत तु घरीच खाऊन पिऊन राहणार काही करु शकत नाही असा टोमना हाणला, त्याचवेळी कर्मवीर भाऊराव पाटलांनी इच्छाशक्ती निर्माण करीत अभ्यासाचा निर्धार केला. आणि कधीच त्यांनी मागे वडून बघितले नाही. हे इतिहास आपल्या समोर आहे. त्यांचा थोडा आदर्श आपण अंगीकारला तर आपल्यात खूप बदल होवू शकते. अभ्यासासाठी वेळ दयावा लागेल. एकाग्रचित्त व्हावे लागेल. माजी राष्ट्रपती अब्दुल कलामासारखे स्वप्न बघायला पाहिजे. वास्तवय अणि विस्तवात जसी समानता आहे. तसेच अभ्यासात वाचनाचे महत्व आहे. परंतु आजची पिढी वाचनाकडे दुर्लक्ष करुन बसली आहे. आणि दुसèया गोष्टीत गुंतत चालली आहे. स्वत:चा रस्ता स्वत:च तयार करावा लागतो. इतिहास घडविणारे हे सुद्धा आपल्यासारखेच लाल रक्ताचे होते. त्यांच्यासारखी जिद्द आपल्या मनात निर्माण झाली पाहिजे. तेव्हाच प्रगतीकडे वाटचाल होईल. हे करित असताना आपल्या चुकांमध्ये मात्र सुधारणा होत गेली पाहिजे.
पुणे येथील विर्नर कॉम्पेटीव इंस्सुट्युचे अभय लांडगे यांनी आपण कुणापेक्षाही कमी नाही. हे मंत्र स्विकारले तर स्पर्धेच्या क्षेत्रात कुणावरही मात करु शकतो. शासनाने नोकèयांच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कपात केली असली तरी विविध क्षेत्रात नोकरी व रोजगराच्या संधी उपलब्ध आहेत. त्या सर्व संधी गोंदिया जिलह्यातील विद्याथ्र्यांना उपलब्ध व्हाव्यात यासाठी आपण आपल्या संस्थेच्यावतीने सर्व सुविधा गोंदियातच उपलब्ध करुन दयायला तयार आहोत. पुण्यात यायची गरज नाही असे विचार व्यक्त केले.
या सत्राची भुमिका मांडताना ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे म्हणाले की बहुजन समाजातील विद्याथ्र्यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये सहभागी व्हायला पाहिजे. इतर धार्मिक कार्यात आपला वेळ घालविण्यापेक्षा तो अभ्यासावर केंद्रीत केला पाहिजे. सोबतच आपल्या न्याय हक्कासाठी ओबीसी संघटनेच्या लढ्यात युवक-युवतींचा सहभागाशिवाय लढा यशस्वी होवू शकत नाही. त्यामुळे या लढ्यात सहभागी होवून आपली जनशक्ती दाखविण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे अनुसुचित जाती-जमातीचया अधिकारी कर्मचाèयांनी संगठन तयार करुन समाजाच्या संघटनेला आर्थिक पाळबळ दिलेले आहे. तसेच पाठबळ ओबीसी अधिकारी, कर्मचारी व पालकांनी दिल्यास ही चळवळ मजबूत होवून वेगाने लढा देऊ शकेल. असे म्हणाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष प्रा.बी.एम. करमकर म्हणाले की, कुठलेही यश प्राप्त करण्यासाठी मनात जिद्द आणि एकाग्रतेची आवश्यकता असते. ती आवश्यकता आपल्यात दिसून येत असून या एकाग्रतेला अभ्यासाच्या रुपात परिवर्तीत करुन स्पर्धेच्या क्षेत्रात भरारी घ्यावे असे विचार व्यक्त केले.यावेळी दिपक बहेकार यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन श्रीमती ब्राम्हणकर यांनी केले. तर आभार राजेश नागरीकर यांनी मानले.यशस्वितेसाठी शिक्षण अधिकार संघर्ष समिती, ओबीसी संघर्ष कृती समिती, ओबीसी सेवा संघ,सविंधान बचाव समिती, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती,शिक्षक सहयोग संघटना,सqवधान बचाव समिती, महाराष्ट्र राज्य प्राथमिक पुरोगामी शिक्षक संघटना गोंदियासह इतर संघटनांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version