केंद्र आणि राज्य सरकारने आठवड्यापुर्वी पेट्रोलच्या किंमतीमध्ये ४ रुपये ३५ पैशांनी कपात केली होती. त्यानंतर सुध्दा दिवसेंदिवस पेट्रोल व डिझेल दरवाढ होत असल्याने आज गोंदिया जिल्हा युवक काँग्रेसने आंदोलन करुन महागाईचा निषेध नोंदविला. आमगाव येथेही पेट्रोलपंपावर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष उज्वल बैस,उपाध्यक्ष नंदु कोरे महासचिव नरेश बोपचे,तालुकाध्यक्ष राहुल चुटे, अरविंद चुटे, समीर खान, विनोद सिगमारे ,मननु आकुकार, आकाश घरडे, पवन मेश्राम, तिरुपति फुंडे, तानेश्वर पधरे, प्रवीण नदेश्वर ,सुभषा चूटे, अभय फुंडे,गुरुश्याम पाथोडे , प्रेमलाल खोटेले ,विष्णु चुटे , गजानन महारवाड़े आदिंनी आंदोलन केले.