Home विदर्भ पाणीटंचाईग्रस्त गांवाच्या भेटीवर जिल्हाधिकारी

पाणीटंचाईग्रस्त गांवाच्या भेटीवर जिल्हाधिकारी

0

गोंदिया,दि.09- जिल्ह्यातील अनेग गावामध्ये पाणीटंचाई निर्माण झाली असून यावर्षीच्या आराखड्यातील पहिल्या टप्यात 25 गाव-वाड्यांत पाणीटंचाईच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.त्या गावातील पाण्याची खरी समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी डाॅ.कादबंरी बलकवडे यांनी आज(दि.09)अधिकार्यांसोबत पाहणी केली.देवरी तालुक्यातील शिलापूर/बोरगाव,आमगाव तालुक्यातील अंजोरा जिल्हा परिषद क्षेत्रात येत असलेल्या वागडोंगरी,बाघाटोला व रामाटोला या गावांना भेट देऊन हातपंप आणि विहिरीची पाहणी करुन पाणीटंचाईसंदर्भात उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले.तसेच नवीन हातपंप व जुन्या हातपंपासाठी पाईप पुरवठा करण्यासंबधीचेही निर्देश दिले.

२०१९ च्या पाणीटंचाई आराखड्यातील पहिल्या टप्यात ज्या 25 गाव-वाड्यांच्या समावेश करण्यात आला त्यामध्ये मोरगाव अर्जुनी,सावरी,खामकुरा,झाशीनगर,पिपरखारी/इंदिरानगर, आमगाव, मांगोटोला,महाका उचेपूर,जेठभावडा,बोरगाव/शिलापूर,टेकरी,बुराडीटोला,डोंगरगाव,जवरी,शिवनटोला,शिवनी,खुर्सीपारटोला,खुर्शीपार,ठाणा,आसोली,जांभुरटोला,तिगाव, बघेडा,वडद,सोनेखारी,पाऊडदौना या गावांचा समावेश आहे.यापैकी काहीं गावांना आज जिल्हाधिकारी डाॅ.कादबंरी बलकवडे,ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता हितेंद्र चव्हाण,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हाश्मी,वरिष्ठ भुजलवैज्ञानिक नंदकिशोर बोरकर,उपविभागीय अधिकारी राठोड यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य जियालाल पंधरे,रामाटोल्याच्या सरपंच संगिताताई ब्राह्मणकर,पाऊळदौन्याचे सरपंच खेमराज उईकेसह तहसिलदार,गटविकास अधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version