Home विदर्भ गोंदिया तालुक्यात 17 शाळा अनाधिकृत

गोंदिया तालुक्यात 17 शाळा अनाधिकृत

0

इयत्ता पहिली ते पुढील शिक्षणाकरीता पाल्यांना दाखल करु नये

  गोंदिया : गोंदिया पंचायत समिती अंतर्गत ज्या खाजगी शाळा कार्यरत आहेत त्यांच्या चौकशीअंती 17 कॉन्व्हेंट/शाळा इयत्ता 1 पहिली ते पुढील वर्गाच्या विना परवानगीने अनाधिकृतरित्या सुरु असल्याचे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती गोंदिया यांनी कळविले आहे. यामध्ये डी.डी.अग्रवाल प्राथमिक शाळा अदासी तांडा, बुध्दीस्ट इंटरनॅशनल कॉन्व्हेंट खमारी, चाणक्‍य कॉन्‍व्हेंट खमारी, विद्याभारती कान्व्हेंट खमारी, सरस्वती शिशु मंदिर खमारी, सरस्वती शिशु मंदिर तांडा, साई कॉन्व्हेंट कटंगी, सरस्वती शिशु मंदिर नागरा, शिवाजी कॉन्व्हेंट हिवरा, द बुध्दीस्ट इंटरनॅशनल स्कूल घिवारी, प्रगती कॉन्व्हेंट रावणवाडी, रोझी किडस् कॉन्व्हेंट रावणवाडी, मातोश्री शिशु मंदिर छिपीया, दशमेश कॉन्व्हेंट हिवरा, गोंदिया नगरपालिका क्षेत्रातील बुध्दीस्ट इंटरनॅशनल कॉन्व्हेंट मरारटोली, दशमेश स्मार्ट किडस् अरिहंत कॉलनी कुडवा व फास्टर किडस् बोपचे पेट्रोलपंप जवळ रिंग रोड गोंदिया, अशा एकूण 17 शाळा अनाधिकृत आहेत. या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पुढील कोणत्याही वर्गात पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश घेवू नये. असे गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती गोंदिया यांनी कळविले आहे.

Exit mobile version