35.8 C
Gondiā
Friday, March 29, 2024
Home Blog Page 2

एका घरात सापडली काडतूस व पिस्तूल; आरोपी फरार

0

गोंदिया(Gondia):- जिल्ह्यातील गुन्हे प्रवृत्ती लोकांच्या मुसक्या आवळण्यासाठी गोंदिया पोलिसांनी अकॅशन प्लॅन आखून कारवाई ची मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत काल गोंदिया शहरातील सावरटोली येथील महानंदे यांच्या घराची झाडाझडती घेतली असता लाकडी दिवाण मध्ये काडतुस व पिस्तूल सापडली. विनापरवाना शस्त्र बाळगल्या (Unlicensed possession of weapons) प्रकरणी दोन भावंडांपैकी एकास अटक करण्यात आली. सुमित विनोद महानंदे (32), असे अटकेतील व भुपेंद्र विनोद महानंदे (28) असे फरार आरोपींची नावे आहेत.

आरोपी दोन भावंडांपैकी एकास अटक; एक फरार

आगामी सण-उत्सव व लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections)पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा, सुव्यवस्था, शांतता अबाधित राहावी यासाठी जिल्ह्यांत अवैध कृती करणारे, जनसामान्य लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर वचक बसावा याकरिता अवैधरित्या शस्त्र बाळगणारे गुन्हेगार, अवैध धंदे करणाऱ्यांवर प्रभावी कारवाई करणाचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी दिले आहेत. या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनात गोपनीय माहितीच्या आधारे सुमित महानंदे, रा. सावराटोली, गोंदिया यांचे राहते घराची झडती घेतली.

गोंदिया पोलिसांची कारवाई

दरम्यान बेडरुम मधील लाकडी दिवानमध्ये एक लोखंडी पिस्टल मॅगझिनसह. किंमती 25,000/-रु चे अग्निशस्त्र अवैधरित्या मिळुन आल्याने जप्त करण्यात आले आहे. यामुळे अवैधरित्या पिस्तुल, बाळगल्याप्रकरणी भुपेंद्र विनोद महानंदे, वय 28 वर्षे, रा. सावराटोली, बजाज बार्ड, गोंदिया ला अटक करण्यात आली. दुसरा आरोपी सुमित विनोद महानंदे (32) हा पोलिसांच्या हाती लागला नाही. दोन्ही आरोपींविरुद्ध गोंदिया शहर पोलीस (Gondia City Police)ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 3, 25, सह कलम 135 म. पो. का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास कायदेशीर कारवाई गोंदिया शहर पोलिस करीत आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, मपोउपनि वनिता सायकर, पोहवा. राजु मिश्रा, महेश मेहर, प्रकाश गायधने, दुर्गेश तिवारी, स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया यांनी केली आहे..

रामटेकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, उमेदवाराचे जात प्रमाणपत्र अवैध

0

नागपूर: रामटेक या अनुसूचित जातीसाठी राखीव लोकसभा मतदारसंघांतील काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला जबर धक्का बसला आहे.बर्वे या नागपूर जिल्हा परिषदेच्या अडिच वर्ष अध्यक्ष होत्या. त्याकाळात एकदाही त्यांच्या जात प्रमाणपत्रांचा मुद्दा उपस्थित झाला नव्हता.पण लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केल्यावर त्यांच्या जात प्रमाणपत्रांचा मुद्दा त्यांच्या राजकीय विरोधकांनी पुढे केला. सरकारी यंत्रणेने त्याची दखल घेतली. मात्र न्यायालयाने स्थगिती दिल्याने प्रकरण थंडावले होते. पण नंतर पुन्हा नव्याने एक तक्रार सामाजिक न्याय विभागाकडे करण्यात आली. त्याची तातडीने चौकशी करावी असे आदेश सचिवांनी जात वैधता प्रमाणपत्र तपासणी समितीला दिले.दरम्यान बर्वे या रामटेकमधून तुल्यबळ उमेदवार ठरू शकतात म्हणून त्यांना काँग्रेसचे उमेदवारी दिली. बुधवारी सकाळी त्यांनी अर्ज दाखल केला होता. दुसऱ्याच दिवशी म्हणजे गुरूवारी त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा निर्वाळा समितीने दिला. यामुळे बर्वे यांची उमेदवारी अडचणीत आली आहे. त्यामुळे कॉंग्रेस या मतदारसंघात कोणती भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बर्वे या न्यायालयात दाद मागणार आहे. त्यांचे पती श्याम बर्वे यांनी डमी अर्ज दाखल केला आहे.

छत्तीसगड सीमेवर पोलीस-नक्षल चकमक

0

डचिरोली : छत्तीसगड सीमेवरील कांकेरच्या जंगलात पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये २७ मार्च रोजी रात्री जोरदार चकमक उडाली. पोलिसांनी दिलेल्या चोख प्रत्युत्तरामुळे नक्षलवाद्यांनी अंधाराचा फायदा घेत जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. घटनास्थळाहून मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपात घडवून आणण्याचे नक्षल्यांचे मनसुबे दुसऱ्यांदा उधळून लावले गेले.

छत्तीसगडच्या औंधीसह एटापल्ली तालुक्यातील कसनसूर, धानोरा तालुक्यातील चातगाव दलमचे नक्षलवादी महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेवरील कांकेरच्या जंगलात तळ ठोकून असून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपात घडवून आणण्याच्या तयारीत होते. यासंदर्भात पोलिसांना गोपनीय माहिती मिळताच पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी या भागात अपर अधीक्षक कुमार चिंता यांच्या नेतृत्वाखाली नक्षलविरोधी अभियान गतिमान केले. राज्य राखीव दलाच्या ८ तुकड्या, सी-६० चे जवान व एक शीघ्रकृती दलामार्फत परसिरात सर्च ऑपरेशन राबविले. यावेळी दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला.रात्री तीनवेळा पोलीस व नक्षलवाद्यांत धूमश्चक्री झाल्या. सुरुवातीला सायंकाळी ६ वाजता, त्यानंतर रात्री साडेनऊ वाजता व २८ रोजी पहाटे साडेचार वाजता चकमक उडाली. पोलिसांनी जशास तसे उत्तर दिल्याने नक्षाल्यांना अखेर माघार घ्यावी लागली. घटनास्थळाहून वायर्स, जिलेटिनच्या काठ्या, बॅटऱ्या, सोलर पॅनल इत्यादी जप्त करण्यात आल्या. या परिसरात नक्षलविरोधी अभियान अधिक गतिमान करण्यात आले आहे.

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी ४० उमेदवारांचे ४९ अर्ज दाखल

0

        लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४

भंडारा, दि. २८: ११ भंडारा – गोंदिया सार्वत्रिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काल २७ मार्च, रोजी नामनिर्देशन पत्राच्या अंतिम तारखेला ३४ उमेदवारांनी ४० नामांकन अर्ज दाखल केले. नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. आतापर्यंत ,४० उमेदवारांनी  एकूण ४९ नामांकन अर्ज दाखल केले आहे. आज नामांकन अर्जांची छाननी सुरू आहे.काल बुधवार दिनांक 27 मार्च,2024 रोजी नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या उमेदवारांची नावे व पक्ष पुढील प्रमाणे आहेत.

           प्रशांत यादवराव पडोळे, काँग्रेस चैत्राम दशरथ कोकासे ,अपक्ष सूर्यकिरण ईश्वर नंदागवळी , आपक्ष ,शरद मार्तंड  इटवले अपक्ष ,सेवकभाऊ निर्धन वाघाये,  अपक्ष विलास बाबुराव लेंडे, लोकस्वराज पक्ष ,अरुण नागोराव गजभिये अपक्ष, सुनील बाबुराव मेंढे भाजप,तुलसीराम गेडाम अपक्ष,  गिरीधर शामराव खळोदेअपक्ष ,विनोद बडोले बहुजन समाज पार्टी  (एबी फॉर्म जोडलेला नाही),

के. एल. रामटेके रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया,(,A) शरद दहिवले पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक, सुनील बाबुराव मेंढे भाजप,

           रामचंद्र आगासे अपक्ष, सोमदत्त ब्रह्मानंद करंजेकर अपक्ष, सोमदत्त करंजेकर भारतीय जनता पार्टी ए.बी फॉर्म जोडला नाही, अजय कुमार रामराव चेल्लीबोईंना अखिल भारतीय परिवार पार्टी, योगेश नारनवरे भीमसेना, युप कुमार मधुकर  पंचबुढे,प्रदीप ढोबळे  ( ए.बी फॉर्म जोडला नाही,)वंचित बहुजन आघाडी,  एडवोकेट धनंजय शामलालजी राजभोज अपक्ष, सुजित उईके बळीराजा पार्टी, गिरीश राजाराम तांडेकर अपक्ष , ओम प्रकाश सोमाजी रहांगडाले अपक्ष, केशव रामदास कहालकर अपक्ष, शांताराम विठोबा जळते बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, संजय गजानन केवट वंचित बहुजन आघाडी ,सतीश सदाराम बनसोड अपक्ष , रतन संपत सुखदेवे बहुजन मुक्ती पार्टी, नरेश बाळकृष्ण गजभिये अपक्ष, संजय कुंभलकर बहुजन समाज पार्टी, देवीलाल सुखराम नेपाळे पीपल्स पार्टी ऑफ इंडिया, विठोबा सोमाजी करंडे भारतीय शक्ती चेतना पार्टी, मुनेश्वर दौलत काटेखाये अपक्ष ,बेनीराम रामचंद्र फुलबांधेअभिनव भारत जनसेवा पक्ष आणि प्रशांत यादवराव पडोळे इंडियन नॅशनल काँग्रेस उमाजी यादवराव भिसे अपक्ष

या उमेदवारांनी काल नामनिर्देशन पत्र दाखल केले.

       आज नामनिर्देशनपत्रांची छानणी करण्यात येणार आहे. ३० मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

कदाचित पुन्हा मतदानाचा अधिकारच मिळणार नाही!

0

भाजपाला हटवा!!
सत्यपाल मलिक यांचा मोदींवर पुन्हा हल्ला!!!

नवी दिल्ली – गेल्या अनेक वर्षापासून नरेंद्र मोदी सरकारवर टीकेचे बाण सोडणारे सत्यपाल मलिक यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. त्यांनी देशवासींना आवाहन केले आहे की, मोदीची सत्ता उलथवून टाका.

त्यांनी एक्सवर लिहिले की, जर मोदी सरकार पुन्हा सत्तेत आले तर तुमच्या मुलांचे भविष्य अंधकारमय होईल. इतकेच नाही तर जर यावेळी संधी घालवली तर तुम्हाला परत कधी मतदानाचा अधिकारही मिळणार नाही. माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी लिहिले की, एक गोष्ट मी खात्रीने सांगू शकतो की, जर २०२४ मध्ये मोदी पुन्हा सत्तेवर आले तर येणाऱ्या काळात तुमच्या मुलांचे भविष्य अंधकारमय होईल.

सत्यपाल मलिक यांनी लिहिले की, सर्व देशवासीयांना माझे आवाहन आहे की, यावेळी निवडणुकीत तुम्ही सर्वांनी जात- धर्म न पाहता भाजपला हरवण्यासाठी मतदान करा. सत्तेत बसलेले लोक देशाला आतून पोखरत आहेत. काही भांडवलदारांसाठी देश लुटला जात आहे. तरुण बेरोजगारीमुळे त्रस्त आहेत. महागाई गगनाला भिडली आहे. सरकारी रुग्णालये व सरकारी शाळा बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जर तुम्ही आपल्या मुलांचे भविष्य उज्जल करणार असाल. महागाईपासून सुटकारा पाहिजे असेल, देशाला वाचवणार असाल तर मोदी सरकारला सत्तेतून उलथवून टाका.

सत्यपाल मलिक यांनी पुढे लिहिले की, जर यावेळी तुम्ही संधी घालवली तर पुन्हा तुम्हाला कधी मतदान करण्याचा अधिकार मिळणार नाही. याआधी सत्यपाल मलिकने अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा विरोध करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. त्यांनी म्हटले की, मी आधीच सांगितले होते की, निवडणुकीच्या आधी अरविंद केजरीवाल यांना अटक केली जाईल. सत्यपाल मलिक यांनी केजरीवाल यांच्या अटकेसाठी थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. त्यांनी लिहिले होते की, सत्तेवर बसलेला हुकूमशहा डरपोक माणूस आहे. जो देशाच्या सरकारी एजन्सीचा गैरवापर करत आहे. अरविंद केजरीवाल यांना अटक करत मोदी सरकारने आपल्या शवपेटीवर अखेरचा खिळा ठोकला आहे.

अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपची नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर

0

अमरावती : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुडे यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश होणार आहे.
अखेर प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आज भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील आपल्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली असून अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा यांना भाजपच्या तिकिटावर रिंगणात उतरविण्याची घोषणा केली आहे. उल्लेखनीय आहे की, गेल्या आठवडाभरापासून नवनीत राणा यांना उमेदवारी बाबत साशंकता निर्माण झाली होती. अखेर आज शिक्कामोर्तब झालं असून भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र प्रकरण अद्याप सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून, कोणत्याही दिवशी निर्णय येऊ शकतो. एप्रिलला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येण्याची शयता वर्तवली जात आहे. आज उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय निवडणुकीपूर्वी येईल असे वाटत नाही. दरम्यान, नवनीत राणा आज रात्री ५० गाड्यांच्या ताफ्यासह नागपुरकरीता रवाना झाले आहे. त्या चंद्रशेखर बावनकुडे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात अधिकृतपणे प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे.यावेळी अमरावती जिल्ह्यातील नेत्यांनाही उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. यामध्ये प्रविण पोटे, खासदार डॉ. अनिल बोंडे हे सुद्धा नागपूरला रवाना झाल्याचे सांगितल्या जात आहे.
दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाकडून नवनीत राणा यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांचे समर्थक, पक्षाचे पदाधिकारी आणि आमदार रवी राणा आणि सुनील राणा यांनी त्यांच्या शंकर नगर येथील निवासस्थानी मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला. राजकमल चौकातही हा आनंद आणि आनंदाचा क्रम सुरूच होता. राणा समर्थकांनी राजकमल चौकात बराच वेळ फटाके फोडले.

लोकांमध्ये एवढा उत्साह पहिल्यांदाच;आघाडीचे उमेदवार डॉ. किरसान यांचा नामांकन अर्ज दाखल

0

गडचिरोली : महायुतीमध्ये लोकसभा तिकीट वाटपावरून जे काही सुरू आहे. त्यावरून अजित पवार आणि एकनाथ शिंदे गटाची अवस्था रस्त्यावरच्या भिकाऱ्यापेक्षाही वाईट झालेली आहे. भाजप देतील तेवढ्या जागांवर समाधानी होण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसून यापुढे ते भाजपचे गुलाम म्हणून जगतील, अशी घणाघाती टीका राज्याचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. ते महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांचा नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी गडचिरोलीत आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.मागील तीन दशकांपासून गडचिरोली जिल्ह्याच्या राजकरणात मी सक्रिय आहे. पण आज उमेदवारी अर्ज दाखल करताना स्वयंस्फूर्तीने सहभागी झालेला जनसमुदाय मी पहिल्यांदाच बघितला. यावरून महायुतीने समजून जावे की त्यांचा पराभव निश्चित आहे. असे आव्हान वडेट्टीवार यांनी केले.

वडेट्टीवार पुढे म्हणाले की, महायुतीला राज्यात २० पेक्षा अधिक जागा मिळणार नाही. हे जागा वाटपादरम्यान अजित पवार गट, शिंदे गट आणि भाजप यांची झालेली दमछाक यातून स्पष्ट झाले आहे. दोन्ही पक्षाने कितीही दावा केला तरी भाजप देतील तेवढ्या जागा मुकाट्याने स्वीकारण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही. यापुढेही ते भाजपचे गुलाम म्हणून जगतील. त्यांची अवस्था काही मागताही येत नाही. बोलताही येत नाही आणि काही सांगताही येत नाही. अशी झालेली आहे. त्यांच्यापेक्षा रस्त्यावरील भिकारी तरी बरा. अशी बोचरी टीका त्यांनी केली. माजी आमदार डॉ. उसेंडी यांनी उमेदवारीच्या लालसेने भाजपमध्ये प्रवेश केला. ही त्यांची राजकीय आत्महत्या असून ते आता भाजपचे पोपट झाले आहे. त्यामुळे काहीही आरोप करत सुटले आहे. असेही ते म्हणाले.तत्पूर्वी त्यांनी गडचिरोली – चिमूर लोकसभेचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांचा नामांकन अर्ज दाखल केला. यावेळी उमेदवार डॉ. नामदेव किरसान, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, आमदार सहसराम कोरोटे, माजी खासदार मारोतराव कोवासे, बबनराव तायवाडे, माजी आमदार आनंदराव गेडाम, सुरेंद्र चंदेल, पेंटारामा तलांडी, रवींद्र दरेकर, अजय कंकडालवार, हनमंतू मडावी तसेच जिल्हाभरातून मोठ्या संख्येने नेते व कार्यकर्ते उपस्थित होते

सुनील मेंढे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
भंडारा:  19 मार्च रोजी होणाऱ्या भंडारा लोकसभेच्या निवडणुकीसाठी आज भाजप महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी आयोजित आशीर्वाद सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,  प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल, आ. नरेंद्र भोंडेकर, आ. विजय रहांगडाले, आ. विनोद अग्रवाल, आ. मनोहर चंद्रीकापुरे, आ. राजू कारेमोरे, माजी मंत्री परिणय फुके, राजकुमार बडोले, राजू जैन, गोपाल अग्रवाल, नाना पंचबुधे, शिशुपाल पटले, उपेंद्र कोठेकर, तारिक कुरेशी, बाळा अंजनकर, जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुधे, येशुलाल उपराडे, धनंजय दलाल, जयदीप कवाडे, अनिल गायधने, पंकज रहांगडाले, प्रदीप पडोळे,  जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, विनोद बांते, हेमंत पटले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

लायंस क्लबच्या वतीने देवरी येथील लहान मुलांना होळी साहित्याचे वाटप

0

देवरी,दि.२७: होळीचा उत्सव लहान मुलांनी मोठ्या थाटात साजरा करावा या उद्देशाने देवरी येथील लायंस क्लबच्या वतीने गेल्या रविवारी (दि.२४ मार्च) रोजी येथील शंभरावर लहान -लहान मुलां-मुलींना होळी साहित्याचे वाटप लायंस क्लबचे अध्यक्ष पारस कटकवार यांच्या हस्ते करण्यात आले.
हे साहित्य वाटप लायंस क्लबचे अध्यक्ष पारस कटकवार यांच्या अध्यक्षते खाली पार पडले. होळी साहित्यांमध्ये पिचकारी, मुखौटा,रंग,गुलाल,भोंगा, फुगाचा पँकीट व चाँकलेट चा समावेश होता. या प्रसंगी क्लबचे उपाध्यक्ष पिंकी कटकवार, सचिव ज्योती रामटेककर,कोषाध्यक्ष तारेश मेश्राम, सदस्य अनील मेश्राम, संगीता पाटील, सुजीत टेटे यांच्यासह शहरातील प्रतिष्ठीत नागरीक विजय पाटील, रिजवान शेख व सरीता जांगळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध

0

मुंबई, दि. 27 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार दि. 18 फेब्रुवारी 2024 रोजी पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक (इयत्ता आठवी) शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेच्या अंतरिम उत्तरसूचीसंदर्भात विहित मुदतीत प्राप्त झालेल्या आक्षेपांवर विषय तज्ज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन परीक्षा परिषदेने सुधारित केलेली अंतिम उत्तरसूची परिषदेच्या https://www.mscepuppss.in आणि https://www.mscepune.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत असल्याची माहिती परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेची इयत्तानिहाय, माध्यमनिहाय, पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची दि. 6 मार्च 2024 रोजी परिषदेच्या संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात आली होती. अंतरिम उत्तरसूचीसंदर्भात विहित मुदतीत प्राप्त झालेल्या आक्षेपांवर विषय तज्ज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन परीक्षा परिषदेने उत्तरसूची सुधारित केली आहे. या उत्तरसूचीतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील. या अंतिम उत्तरसूचीबाबत आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. या अंतिम उत्तरसूचीच्या आधारे निकाल तयार करण्यात येईल, असेही परिषदेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

error: Content is protected !!