41.3 C
Gondiā
Friday, March 29, 2024
Home Blog

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ईडी व सीबीआय हे कार्यकर्ते- नाना पटोले

0

गोंदिया : राष्ट्रवादीचे नेते खा. प्रफुल्ल पटेल यांना विमान घोटाळा प्रकरणी सीबीआयनं क्लीनचीट दिली आहे. त्यामुळं पटेल यांना दिलासा मिळाला आहे. सीबीआयने दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टात या याप्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखल केला. सन २०१७ मधील एका भ्रष्टाचार प्रकरणात प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात कोणताही सबळ पुरावा नसल्याचं सीबीआयनं कोर्टात सांगितलं आहे. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रफुल पटेल यांना टोला लावला असून ते वाशिंग मशीन मध्ये गेले आहेत. त्यामुळे स्वाभाविक आहे जे व्हायचं ते होणारच होतं असं म्हटलं आहे.देशात गेल्या १० वर्षापासून ईडी आणि सीबीआय हे नरेंद्र मोदी यांचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे जे तिकडे गेले त्यांना माफी मिळणारच आहे. असे नाना पटोले म्हणाले.तिरोडा येथील जुनी नगर परिषद ग्राउंड वर गुरूवारी प्रचार सभा घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधत ते बोलत होते. पटोले म्हणाले की पुढील काही दिवसात त्यांना इकबाल मिरची प्रकरणातून पण क्लिनचिट मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. हे समजण्यास पण आता हरकत नाही.
लोकांमध्ये मोदी सरकार विरोधात प्रचंड राग आहे. शेतकरी, तरुण, छोटा व्यापारी ,सर्व सामान्य जण यांच्या मनात राग आहे.त्यामुळे पुढील निवडणुकीत हे १५० पार जाणार नाहीत. यांना सत्तेतून जनताच बाहेरचा मार्ग दाखविणारा अशी टीका काँग्रेस पक्षातील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. या प्रसंगी गोंदिया भंडारा लोकसभा काँग्रेस उमेदवार डॉ. प्रशांत यादवरावजी पडोळे,माजी मंत्री सतिश चतुर्वेदी,माजी खासदार खुशालचंद्र बोपचे,माजी आमदार दिलीप बनसोड,रविकांत बोपचे आदि उपस्थित होते.

निवडणूक निरीक्षकांनी घेतला यंत्रणेचा आढावा

0

भंडारा, दि. 29 : 11 भंडारा- गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त निरीक्षक विनय सिंग व कायदा व सुव्यवस्था निरीक्षक राजपाल सिंग यांनी आज निवडणूक यंत्रणेसाठी नियुक्त नोडल अधिकारी यांच्या कामाचा आढावा घेतला.

           जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी यावेळी निवडणूक यंत्रणांनी केलेल्या पूर्वतयारीचा, घेतलेल्या प्रशिक्षणाचा, उपलब्ध मनुष्यबळाचा तसेच पोलीस अधीक्षक गृहीत मतांनी यांनी निवडणूक प्रक्रियेसाठी लागणाऱ्या पोलीस दलाच्या  मनुष्यबळाचे व्यवस्थापन आणि अंतर सीमा तपासणीसाठी घटित पथकांची माहिती यावेळी सादर केली.

           यावेळी बोलताना विनय सिंग यांनी भंडारा जिल्ह्यातील निवडणूक विषयक कामकाज व पूर्वतयारीबाबत समाधान व्यक्त केले. तसेच निवडणुकीसाठी प्रभावी पद्धतीने प्रतिसाद प्रणाली भंडारा जिल्ह्याने तयार केली असल्याचे मत नोंदवले.

         मतदान प्रक्रियेमध्ये 85 पेक्षा  अधिक वय असलेले जेष्ठ नागरिक तसेच दिव्यांग आणि घरी जाऊन मतदान करण्याच्या व्यवस्थेबाबत त्यांनी माहिती घेतली.

        घरी जाऊन मतदान घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेने व गुप्ततेने मतदान प्रक्रिया पार पाडावी अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

         कायदा व सुव्यवस्था निरीक्षक राजपाल सिंह यांनी निवडणूक कामांमध्ये कार्यरत पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांनी चोखपणे आपले कर्तव्य बजवावे . निष्पक्ष व निर्भय वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पाडावी ,असे आवाहन यावेळी केले.या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, अप्पर जिल्हाधिकारी आशा पठाण, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रशांत पिसाळ यासह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.

            त्यानंतर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी सोबत निरीक्षकांची बैठक संपन्न झाली. त्यामध्ये राजकीय पक्षांचे प्रतिनिधींचे मतदान प्रक्रियेबाबत किंवा प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या पूर्वतयारी बाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचे मत देखील निरीक्षकांनी जाणून घेतले.तत्पूर्वी दोन्ही निरीक्षकांनी नियंत्रण कक्षांना भेट देऊन विविध पक्षांचे कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी केली.

शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) साजरी केली छत्रपती शिवाजी महाराज जयंती

0

गोंदिया :- अखंड महाराष्ट्राचा निर्माता, ज्यांच्या शौर्याने सर्वोत्कृष्ट योद्धेही मैदानात हादरले. हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या थोर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दोन प्रकारे साजरी केली जाते.दुसऱ्या तारखेनुसार 28 मार्च रोजी साजरा केला जातो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), गोंदिया येथे कार्यालय, सूर्यटोला, मनोहर चौक, नेहरू चौक येथे प्रार्थना करण्यात आली.यावेळी अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला.तसेच महाप्रसाद वितरण करण्यात आले.

जयंती च्या या प्रसंगी शिवसेना (उद्धव बालासाहेब ठाकरे) चे जिला प्रमुख पंकज एस यादव,सुनील लांजेवार, हरिश तुलसकर, समीर लोहित,अनिल कुमार मेश्राम, संजू समशेरे, विनीत मोहिते,विकी बोमचर, कपिल नेवारे, वंदना मस्के महिला आघाड़ी , प्रवीण धामडे, कपिल नेवारे, लक्ष्मण , तरुण कानोजिया, दिनेश राउत व अनेक कार्यकर्त्ता उपस्थित होते.

भाजपने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची माफी मागावी : संजय राऊत

0

एअर इंडिया-इंडियन एअरलाइन्सविलीनीकरणप्रकरणी सीबीआयची क्लीन फसवणूक 

मुंबई,दि.२९- एअर इंडिया-इंडियन एअरलाइन्स विलीनीकरण प्रकरणी सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केल्यानंतर शिवसेनेने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची माफी मागावी, अशी मागणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे.
यूपीए सरकारच्या काळात एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्सच्या विलीनीकरणाने स्थापन झालेल्या एनएसीआयएल या कंपनीने विमानभाड्याने देण्याच्या कथित गैरव्यवहाराच्या चौकशीत केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे.
राष्ट्रवादी चे नेते प्रफुल्ल पटेल हे आता अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील संघटनेशी संबंधित असून ते यापूर्वीच्या काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारमध्ये केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री होते.
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात नागरी हवाई वाहतूक क्षेत्रातील कथित भ्रष्टाचारावर भाजपने आरडाओरडा केला होता. भाजपने डॉ. सिंग यांची माफी मागावी.

एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्सच्या विलीनीकरणानंतर नॅशनल एव्हिएशन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसीआयएल) ची स्थापना करण्यात आली.
हा निर्णय बेईमानीने घेण्यात आला आणि अधिग्रहणाचा कार्यक्रम सुरू असतानाच विमान भाड्याने देण्यात आल्याचा आरोप सीबीआयने केला आहे.

इतर अनोळखी व्यक्तींसोबत कट रचून भाडेपट्ट्याचा निर्णय घेण्यात आला, ज्यामुळे खासगी कंपन्यांना आर्थिक फायदा झाला आणि परिणामी सरकारी तिजोरीचे नुकसान झाले, असा आरोप सीबीआयने एफआयआरमध्ये केला आहे.

 

गडचिरोलीत आदिवासी नागरिकाची निर्घृण हत्या

0
file photo

गडचिरोली : पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी एका आदिवासी नागरिकाची गळा आवळून हत्या केली. अशोक तलांडी ( रा.दामरंचा) असे मृत व्यक्तीचे नाव असून आज, शुक्रवारी सकाळी भामरागड-आलापल्ली मार्गावरील ताडगावजवळ त्याचा मृतदेह आढळून आला.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पुन्हा एकदा नक्षलवादी सक्रिय झाल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी रेपनपल्ली हद्दीत झालेल्या चकमकीत पोलिसांनी चार नक्षल्यांना कंठस्नान घातले होते. गुरूवारीदेखील छत्तीसगड सीमेवर मध्यरात्री सहा तास चकमक चालली. दरम्यान, शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम दामरंचा गावातील रहिवासी असलेल्या अशोक तलांडी या आदिवासी व्यक्तीचा भामरागड-आलापल्ली मार्गावरील ताडगावजवळ मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली.मृतदेह शेजारी टाकलेल्या पत्रकात नक्षल्यांनी अशोक हा पोलीस खबऱ्या असल्यामुळे त्याची हत्या करीत असल्याचे म्हटले आहे. माहिती मिळताच ताडगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आहे. या हत्येमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. यासंदर्भात पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांना विचारणा केली असता त्यांनी मृतक हा पोलीस खबऱ्या नसून चौकशीनंतर या प्रकरणाचा उलगडा होईल. असे स्पष्ट केले आहे.

मी मतदान करणारच ‘ सर्वांनी निर्धार करा – उपविभागीय अधिकारी वरुणकुमार सहारे

0

मतदान जनजागृती बाईक (दुचाकी) रॅली संपन्न
अर्जुनी मोर-” येत्या 19 एप्रिल ला भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघात निवडणूक होऊ घातलेली आहे. या निवडणूक प्रक्रियेत सर्वांनी सहभागी होऊन मतदान करावे. आपण सर्वांना मतदानाचे महत्त्व पटवून देऊन सर्वांना मतदानाचे कर्तव्य पार पाडायचे आहे. ‘मी मतदान करणारच’ हा निर्धार सर्वांनी करा… आणि लोकशाहीला अधिक बळकट करा “असे आवाहन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वरुणकुमार सहारे यांनी केले आहे. अर्जुनी मोरगाव येथे बाईक(दुचाकी) रॅली काढून सर्वांना या बाबतीत जागरूक करण्यात आले,याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील, नगरपंचायत मुख्याधिकारी राजू घोडके, प्राचार्य डॉ ईश्वर मोहुर्ले, नायब तहसीलदार मंगेश क्षीरसागर, तसेच स्वीपच्या नोडल अधिकारी स्वाती तायडे आदी मान्यवर उपस्थित होते.
दुर्गा चौकातून या रॅलीची सुरुवात झाली. पुढे हातझाडे मोहल्ला, बरडटोली, सिंगलटोली, कापगते कॉम्प्लेक्स मुख्य बाजार लाईन सिव्हील लाईन शिक्षक कॉलनी फ्रेन्डस कॉलनी रेल्वे स्टेशन परिसर आदी प्रमुख मार्गावरून ही रॅली फिरविण्यात आली
यात सहभागी सर्वांनी पांढरा शर्ट आणि काळा पँट, तसेच महिलांनी पांढरा सलवार किंवा साडी परिधान केली होती.
या रॅलीचा समारोप उपविभागीय कार्यालयात झाला. यावेळी वरुणकुमार सहारे यांनी सहभागी झालेल्या सर्वांचे आभार व्यक्त केले. या रॅली मध्ये पोलीस विभाग, महसूल विभाग, नगर पंचायत, उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय येथील सर्व कर्मचारी तसेच बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.

आजपासून यवतमाळच्या सत्यशोधक विद्यापीठात युवकांकरीता प्रशिक्षणाचे आयोजन

0

यवतमाळ,दि.29ः- येथील महात्मा ज्योतिबा फुले सत्यशोधक विद्यापीठ सत्यशोधक नगरी चांदोरे नगर यवतमाळ येथे वैद्यकीय अभ्यासक्रम करीत असलेल्या विद्यार्थ्यांकरीता प्रशिक्षणाचे आयोजन 29 ते 31 मार्च दरम्यान करण्यात आले आहे.खाणपान,जीवन जगण्याची कला ,ताण तणाव नियोजन, या विषयावर प्रा.काशिनाथ लाहोरे,कर्तव्याने घडतो माणूस, आकाशी झेप घे रे पाखरा,सकारात्मक दृष्टिकोन व कायझन तंत्र या विषयावर सुद्धा ते मार्गदर्शन करणार आहेत. ओबीसी आरक्षणाची संकल्पना प्रशासकीय व न्यायालयीन संघर्ष यावर डॉ.राऊत मार्गदर्शन करणार आहेत.भारतीय संतांचे जागृती कार्य,मनुस्मृतीनंतरचा भारत ,महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष ,स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर भारत, भारतातील प्रचलित विचारधारा नवभारतासाठी भूमिका व योगदान ,सामाजिक क्रांती व प्रतिक्रांतीचा इतिहास वैदिक धर्म त्यांची सामाजिक आर्थिक सांस्कृतिक व्यवस्था, या विषयावर सत्यशोधक इंजि. अरविंद माळी यांचे मार्गदर्शन होणार आहे.महात्मा फुले पर्यायी संस्कृतीचे जनक, हम होंगे कामयाब या विषयावर डॉ.ज्ञानेश्वर गोरे,सोबतच जिंदगी ना मिले दोबारा या विषयावर सुद्धा ते मार्गदर्शन करणार आहेत ,ओबीसीसह सर्व जातींची जनगणना या विषयावर डॉ.विलास लिलाबाई दशरथ काळे हे मार्गदर्शन करणार आहेत.मंडल पूर्वी व मंडल नंतरचा ओबीसी ,प्राध्यापक सुनीता विलास काळे हे मार्गदर्शन करणार आहेत.कौशल्य विकास गटचर्चा विषयांकित सादरीकरण याबाबत डॉ.गोरे, मायाताई गोरे ,डॉ.राऊत, डॉ.विलास काळे हे मार्गदर्शन करणार आहेत.हे विश्व आहे तरी केवढे या विषयावर स्काय वॉच ग्रुपचे रवींद्र खराबे हे मार्गदर्शन करणार आहेत.तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी विद्यापीठांमध्ये आलेले आहेत ,अशी माहिती मुख्य आयोजक डॉ.ज्ञानेश्वर गोरे यांनी दिलेली आहे.

१ एप्रिलपासून रजेसाठी शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना करावा लागेल ऑनलाइन अर्ज

0

गोंदिया : राज्य शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना १ एप्रिलपासून रजा घ्यायची असल्यास त्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. यामुळे प्रचलित ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया कालबाह्य होणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने त्यासंदर्भातील आदेश (गुरुवार दि.28 मार्च) काढले आहेत.

राज्य शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या सेवा पुस्तकविषयक बाबीसंदर्भात ‘ई-एचआरएमएस’ (ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टिम) प्रणाली विकसित करण्यात आली असून त्याअंतर्गत सर्व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची डिजिटल सेवापुस्तके तयार करण्यात येत आहेत. तसेच सर्व प्रशासकीय विभागांच्या नियंत्रणाखालील अधिनस्थ कार्यालयांचा (उदा. आयुक्तालय, संचालनालय इ.) समावेश या नवीन प्रणालीत करण्यात येत आहे. या प्रणालीवर सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तकविषयक माहिती भरण्याबाबत सर्व संबंधित विभागांना राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने ३ मार्च २०२३ च्या परिपत्रकानुसार सूचना देण्यात आल्या आहेत. या नवीन प्रणालीमध्ये सुटी (leave) या पर्यायात रजेचे ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. बऱ्याच विभागांमध्ये ऑनलाइन अर्ज करण्याचे प्रमाण फारच कमी असल्याचे आढळून आले आहे.

आता ही नवीन प्रणाली यशस्वीरीत्या कार्यान्वित होण्यासाठी प्रत्येक विभागातील सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या रजेचे अर्ज ऑनलाइन करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व मंत्रालयीन विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येकांनी त्यांच्याअंतर्गत असलेल्या सर्व अधिकारी, कर्मचारी (खुद्द आणि क्षेत्रीय) यांना १ एप्रिलपासून त्यांच्या सर्व रजेचे अर्ज या नवीन प्रणालीमार्फतच करण्याच्या सूचना द्याव्यात, असेही सामान्य प्रशासन विभागाच्या या आदेशात नमूद आहे.

रजेचा ऑफलाइन अर्ज चालणार नाही

सर्व विभागांनी त्यांच्याअंतर्गत येणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे रजा लेखे अद्ययावत ठेवावेत. कोणतेही रजेचे अर्ज ऑफलाइन घेण्यात येऊ नयेत, अशा सूचना राज्यातील सर्व शासकीय विभागांना सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव रोशनी दिनेश कदम- पाटील यांनी परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. त्यामुळे आता शासकीय कर्मचाऱ्यांना यापुढे रजेचा अर्ज ऑनलाइनच करावा लागणार आहे. यामुळे कोणता अधिकारी, कर्मचारी रजेवर आहे, हे एका क्लिकवर समजण्यास मदत होणार आहे.

समाजकार्य महाविद्यालयात “वोट कर – जळगाव कर” मतदान जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न

0

जळगाव, दि. 29 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय, जळगांव येथे निवडणूक विभागाच्या SVEEP उपक्रमाअंतर्गत आर.जे.देवा व आर.जे.शिवानी यांच्या प्रमुख उपस्थितीत मतदान जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न झाला.

या जनजागृतीपर कार्यक्रमात समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्सफुर्तपणे सहभाग घेऊन सेल्फी पॉईट ला सेल्फी घेऊन “वोट कर जळगांव कर” या फलकावर स्वाक्षरी मोहीम राबविली.  यावेळी ‘रेडिओ जॅकी’ शिवानी यांनी “वोट कर – जळगांव कर”, “ चुनाव का पर्व देश का गर्व” ‘माझे मत- माझे भविष्य”, “मतदार राजा जागा हो -लोकशाहीचा धागा हो”, “नर असो वा नारी-मतदान ही सर्वांची जबाबदारी”, “आपल्या मताचे दान- आहे लोकशाहीची शान”, “नवे वारे नवी दिशा-मतदानच आहे उद्याची आशा” अशा विविध घोषणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण केला.

यावेळी उपस्थित ‘रेडिओ जॅकी’देवा यांनीही उपस्थित विद्यार्थ्यांना आवाहन केले की, तुम्ही मतदार यादीत नाव नोंदवलं नसेल तर तात्काळ नाव नोंदवा, इतर मतदारांनाही नाव नोंदणीसाठी प्रेरित करा ,मतदानाप्रती नागरिकांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी प्रत्येकांनी योगदान द्यावे.

समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.राकेश चौधरी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक म्हणून देश हितासाठी मतदान करण्याचे आवाहन  केले. कार्यक्रमात शेवटी सर्व उपस्थितांना लोकशाहीच्या परंपरेचे जतन, निष्पक्षपाती , निर्भयपणे व कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करण्याची शपथ घेतली.

महिला बचत गटांनी करावी महिलांमध्ये मतदानाविषयी जनजागृती – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

0

छत्रपती संभाजीनगर, दि.29:- महिला बचतगट हे महिलांचे संघटन आहे. या महिलांचा आपापल्या परिसरात इतर महिलांशी दैनंदिन संपर्क असतो. या संपर्काचा वापर करुन महिला बचत गटांनी महिलांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करावी व मतदानातील महिलांचा सहभागाचा टक्का वाढवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केले.

मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र सभागृहामध्ये आज महानगरपालिका क्षेत्रातील महिला बचत गटांचा मतदार जाणीव जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी महिला बचत गटांचे अध्यक्ष, सचिव सदस्य उपस्थित होते. तसेच ‘स्वीप’ चे नोडल अधिकारी सुदर्शन तुपे, उपायुक्त पांढरे, स्वप्निल सरदार, गटशिक्षण अधिकारी श्रीमती थावरे यांच्यासह विविध महिला बचत गटाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, महिला मतदारांची संख्या ५०% पेक्षा जास्त आहे. मतदानामध्ये सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. एकही महिला मतदानापासून वंचित राहू नये किंवा सुविधा अभावी मतदान करता आले नाही; ही सबब राहू नये म्हणून  निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पाळणाघर, महिला  मतदान केंद्र, मतदान सहायता कक्ष त्याचप्रमाणे  पिण्याचे पाणी,  उन्हापासून संरक्षण करण्यासाठी सावली इ. व्यवस्था करण्यात येत आहे.

शहरातील महिलांना मतदानासाठी  सहभागी करून घेण्यामध्ये महिला बचत गटांनी सहभाग द्यावा. बचत गटाच्या माध्यमातून बँक सखी, अशा वर्कर, बचत गटाच्या सदस्य, लघुउद्योग, महिला गृह उद्योग यातील सर्व महिलांना मतदानात सहभाग घेण्याचे आवाहन करावे.  कार्यशाळा, प्रशिक्षण उपक्रम व इतर कार्यक्रमाच्या ठिकाणी मतदान करण्याबाबत  आवाहन करण्यात याव,.असे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सुचित केले.

मतदान केंद्रावर पाळणाघर सुविधा पुरविण्यात महिला बालविकास विभागाची महत्त्वाची भूमिका

मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी मतदान केंद्रावर सुविधा पुरविण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. विशेषतः ज्या स्तनदा माता, लहान बाळ असणाऱ्या माता आहेत. त्यांच्या बालकांसाठी मतदान केंद्र इमारतीत पाळणा घर सुविधा द्यावयाची आहे. हे पाळणाघर संचालन करण्याची महत्त्वाची जबाबदारी महिला व बालविकास विभागाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी पार पाडावयाची आहे,असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.

मतदान केंद्रांवर महिला मतदारांना द्यावयाच्या विविध सुविधांची अंमलबजावणी करण्यासाठी आज महिला व बालविकास विभागाच्या जिल्हा तालुकास्तरीय अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक बोलावण्यात  आली होती. जिल्हा नियोजन सभागृहात पार पडलेल्या या बैठकीस जिल्हा महिला बालविकास अधिकारी सुवर्णा जाधव तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी, तालुका बालविकास अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, ग्रामीण व शहरी भागातील महिलांना मतदान केंद्रावर मतदान करतांना कडेवर असलेले बाळ सांभाळून रांगेत उभे राहणे गैरसोईचे होऊ शकते. त्यासाठी तितका वेळ त्यांची बालके सांभाळण्यासाठी पाळणाघर स्थापित करण्यात येईल. मतदान केंद्राच्या इमारतीत हे पाळणा घर असेल. तेथे महिला व बालविकास विभागाची महत्त्वाची जबाबदारी असेल. तसेच, महिला बालकल्याण विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी मतदार जाणीव जागृतीच्या माध्यमातुन  मतदानाचे महत्त्व लक्षात आणून द्यावे. जिल्ह्यात काही ठिकाणी महिला मतदान केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. ही मतदान केंद्र पूर्णतः महिला अधिकारी कर्मचारी संचलित करतील,असेही त्यांनी सांगितले.

error: Content is protected !!