
अमरावती,दि.10ः- अमरावतीच्या सामाजिक वनीकरण विभागातील विभागीय वनअधिकार्याला पाच लाख रुपयाची लाच घेतांना अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज ताब्यात घेतले आहे.लाच घेणार्या विभागीय वन अधिकार्याचे नाव राजेंद्र गणेशराव बोंडे (वय 57,रा. मोर्शी,जिल्हा अमरावती) असे आहे.तक्रारदाराचे आरोपी हे वरिष्ठ अधिकारी असून तक्रारदार यांना सामाजिक वनीकरण, वरुड जिल्हा अमरावती येथील अतिरिक्त कार्यभार दिल्याचा मोबदला म्हणून आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदाराला 5,00,000/- रु लाचेची मागणी केली.मात्र तक्रारदाराला रक्कम द्यायची मूळीच ईच्छा नसल्याने लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदवली.त्या तक्रारीच्या आधारे पहिल्यांदा 16 जुर्ले रोजी पडताळणी करण्यात आली.त्यानंतर आज 10 सप्टेंबर रोजी पडताळणी दरम्यान पंचांसमक्ष 5,00,000/- रु मागणी करून दोन टप्प्यांमध्ये स्विकारण्याचे मान्य केले. आज सापळा कारवाई दरम्यान पहिला टप्पातील 2,50,000/- रू लाच स्विकारताना ताब्यात घेऊन गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली आहे.पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधिक्षक पंजाबराव डोंगरदिवे,पोलीस उपअधिक्षक गजानन पडघन,पो हे कॉ. चंद्रशेखर दहिकर,नापोशि सुनील वऱ्हाडे, पोशि अभय वाघ, चालक नापोशि चंद्रकांत जनबंधू
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती यांनी ही कारवाई केली.





