
गोंदिया(सतिश पारधी): गोंदिया-नागपूर ला दररोज प्रवास करणाऱ्या प्रवासीयांची लाईफ लाईन समजल्या जाणारी महाराष्ट्र एक्सप्रेस आज गोंदियाहून कोल्हापूर च्या दिशेने १३२ प्रवासी घेऊन वेळेवर निघाली. गोंदिया ते नागपूर प्रवास करणारे अनेक प्रवासी आहेत, त्यापैकी बरेच लोक रोजच्या अनेक कामांसाठी दररोज प्रवास करत असतात. पण कोरोनामुळे लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी महाराष्ट्र एक्स्प्रेस मागील साडेसहा महिन्यांपासून बंद होती. यामुळे व्यापारी कर्मचारी, सरकारी कर्मचारी, खासगी नोकरी करणार्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागला.आजपासून महाराष्ट्र एक्सप्रेस सुरुवात झाल्यामुळे नक्कीच सर्वसामान्य नागरिकांचे आयुष्यही परत रुळावर येईल.
गोंदिया ते नागपूर असा करा प्रवास
प्रवाशांना महाराष्ट्र एक्स्प्रेसने गोंदिया ते नागपूर असा प्रवास करायचा असेल तर त्यांच्यासाठी तिकिटांचा वेगळा पर्याय आहे. यापैकी सेकंड एसीचे भाडे 645 रुपये आहे. थर्ड एसीचे भाडे 460 रुपये, द्वितीय श्रेणी स्लीपर (एसएल) भाडे 135 आणि द्वितीय श्रेणी स्लीपर आसन (2 एस) 70 रुपये आहे.ही सर्व आरक्षित तिकिटे केवळ ऑनलाइन बुकिंगवर मिळू शकतात. याशिवाय रेल्वेने प्लॅटफॉर्मच्या तिकिटाच्या काउंटरवर सकाळी आठ ते संध्याकाळी चार या वेळेत आगाऊ राखीव तिकिट बुकिंगची व्यवस्था केली आहे, तेथून ऑनलाईन आरक्षित तिकिटे आरक्षित करता येतील.





