
कोसमतोंडी:-(महेंद्र टेंभरे):-शिवसेनेच्या येथे पार पडलेल्या सभेत जिल्हा तसेच तालुका पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पांढरी परिसरातील शेकडो महिला पुरुषांनी शिवसेनेचे शिवबंधन बांधून पक्ष प्रवेश घेतला. यावेळी प्रवेश घेतलेल्या स्थानिक महिलांनी दारूबंदीसाठी ठराव घेत शिवसेना पदाधिकाऱ्यांना दारूबंदीसाठी साकडे घातले. तर रेशन बरोबर मिळत नसल्याची तक्रार सुद्धा केली. यावेळी पांढरी येथूनच दारूबंदीसाठी शिवसेनेतर्फे एल्गार पुकारण्यात आला. या सभेला शिवसेना जिल्हा उपप्रमुख शैलेश जायस्वाल, जिल्हा संघटक राजूभाऊ पटले, जिल्हा समन्वयक पंकज यादव, युवासेना जिल्हा उप अधिकारी महेश डुंबरे, तालुकाप्रमुख मनोज रामटेके, तालुका सचिव बबन बडोले, तालुका प्रसिद्धीप्रमुख असलेस माडे, सौंदड विभाग प्रमुख विशाल उजवणे, विभाग प्रमुख कुंभरे, सौरभ गोस्वामी, उकेजी, विशाखा पटेल, प्रधान बाई, तसेच तालुक्यातील इतर पदाधिकारी व पांढरी परिसरातील असंख्य कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.





