42.5 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home Top News गोंदिया,चंद्रपुर,सडक अर्जुुनीसह राज्यात भारत बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद

गोंदिया,चंद्रपुर,सडक अर्जुुनीसह राज्यात भारत बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद

0
345

blank

गोंदिया,दि.08ः: केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांवरुन देशभरातील विविध राजकीय पक्ष आणि संघटनांकडून आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. शेतकèयांच्या आज ८ डिसेंबरच्या भारत बंद मध्ये काँग्रेससह, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, माकप, भाकप, बसपा, बहुजन वंचित आघाडी, स्वाभीमानी संधठनेसह ओबीसींच्या सर्व संगठना व पक्षाचा उस्फुर्त सहभाग होता.मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भात चांगला प्रतिसाद मिळत आहे.गावखेड्यातही बंद पाडले जात आहे.blank

गोंदिया जिल्ह्यातही बंदला उत्तम प्रतिसाद मिळाला असून गोंदियात सकाळी भाजप वगळता सर्वपक्षीय  सामाजिक संगठनाच्या एकोप्याने मोर्चा काढण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन सुरुवात करण्यात आली.राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार प्रफुल पटेल,माजी आमदार राजेंद्र जैन यांनी भेट दिली. मोर्च्यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेवराव किरसान, शिवसेना जिल्हाध्यक्ष मुकेश शिवहरे, राष्ट्रवादीचे नगरसेवक सतिश देशमुख,सुनिल पटले, संजीव बिहारी,वासनिक,मयुर दरबार, काँग्रसेच विनोद जैन, अशोक गुप्ता, अमर वèहाडे, शिवसेनेचे पंकज यादव,टिलु गुप्ता,सुनिल लांजेवार,भाकपचे हौसलाल रहांगडाले, मिलिंद गणवीर, रामचंद्र पाटील, शेखर कनोजिया, करुणा गणवीर, प्रल्हाद उके, चरणदास भावे, रामचंद्र मानकर, अशोक मेश्रा‘, परेश दुरुगकर, भैयालाल कटरे, संविधान मैत्री संघाचे अतुल सतदेवे, सुनील भोंगाडे, रवि भांडारकर, ओबीसी संघर्ष कृती समितीचे कैलास भेलावे, आम आदमी पार्टीचे पुरुषोत्तम मोदी,मराठा सेवा संघाचे सुनील तरोणे, राजीव ठकरेले, काँग्रेस किसान आघाडीचे जितेश राणे, सुनील पटले,जहिर अहमद,पप्पू पटले बाजार समितीचे सभापती चुनिलाल बेंदरे आदिंचा सहभाग होता.

blank
राज्यभरातील विविध भागांमध्ये हा बंद पाळला जात आहे. महाविकास आघाडी सरकारचा या बंदाला पाठिंबा आहे. तसेच राज्यभरात शेतकèयांसाठी आंदोलक हे रस्त्यावर उतरले आहेत. पुणे, जालना,नाशिक, नागपूरमध्ये बाजारपेठांमध्ये शांतता पाहायला मिळतेय. तर काही ठिकाणी शेतकरी संघटनांकडून शांतते निषेध नोंदवला जातोय. तर जालन्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दूध वाटप करून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला जात आहे. जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे बालकांना तसेच ग्रामस्थांना दूध वाटप करून या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली आहे. हे आंदोलन शांततेच्या मार्गाने केले जाणार असल्याचे शेतकरी संघटनेकडून जाहीर करण्यात आले आहे.
बुलडाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी कार्यकत्र्यांसह चेन्नई-अहमदाबाद एक्सप्रेस मलकापूर रेल्वे स्थानकावर अडवली आहे. यासोबतच शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे आज लाक्षणिक उपोषणला सुरुवात केली आहे.
सडक-अर्जुनी: केंद्र शासनाच्या विरोधात महाविकास आघाडीसह विविध पक्षांनी पुकारलेल्या बंदला सडक-अर्जुनी तालु्नङ्मात चांगला प्रतिसाद मिळाला.व्यापार पेठ बंद करण्यासाठी काढलेल्या मोर्च्यात आमदार मनोहर चंद्रिकापुरे, मधुसूदन दोनोडे,डॉ. अविनाश काशिवार, मनोज रामटेके, रजनी गिरेपुंजे, राजु पटले, परसराम राऊत, दामोदर नेवारे ,एफ.आर.टी.शहा, उमराव मांढरे, फारूख शेख, दिनेश कोरे, वंदना डोंगरवार, दिलीप गभणे, आनंद अग्रवाल ईत्यादी मान्यवर उपस्थित होते.blank

केंद्र शासनाने कृषीविषयक कायदा पारित केला असून तो शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असल्याचा आरोप करत दिल्लीत शेतकऱ्यांकडून अभूतपूर्व आंदोलन केले जात आहे. याला पाठिंबा म्हणून देशातील विविध शेतकरी संघटनांनी ८ डिसंेबरला भारत बंदचा नारा दिला आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतही याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. बहुतांश जिल्ह्यांमध्ये व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात येतील. काही ठिकाणी एसटी बसेस बंद करण्याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल. बाजार समित्याही बंद ठेवण्यात येणार आहेत. काँग्रेसकडून चक्का जाम आंदोलनाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.blank

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा ‘भारत बंदला’ पाठींबा- नागपुर-चंद्रपुर महामार्गावर निदर्शने व रस्ता जाम

चंद्रपुर-: केंद्र शासनाने कृषि विषयक तीन कायदे पारित केलेले आहेत, त्यास विरोध म्हणून देशातील विविध संघटनांतर्फे दि. 8 डिसेंबर 2020 रोजी भारत देश बंदचे आवाहन करीत आंदोलन छेडले. या आंदोलनात सहभाग घेत राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे बंदला पाठींबा देवून या शेतकरी विरोधी कायद्यांचा निषेध करीत स्थानिक जनता कॉलेज चौकात आज (दि.8) ला सकाळी 11 वाजता निदर्शने केली.यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वयक डॉ. अशोक जिवतोडे, महासचिव सचिन राजुरकर, बबनराव फंड, बबनराव वानखेडे, यांच्या मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष नितिन कुकडे, सचिव विजय मालेकर, कार्याध्यक्ष बबन राजुरकर, डॉ. संजय बरडे, संजय सपाटे, आल्हाद बहादे, रविकांत वरारकर, मंगेश पाचभाई, जिल्हा महिला अध्यक्षा सौ. जोत्स्ना राजुरकर, सौ. विदया शिंदे, सौ. मन्जुळा डुडुरे, राहुल ठाकूर, जितेंद्र बुचे, सचिन थिपे, प्रकाश गाठे, इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

औरंगाबाद : दुपारपर्यंत रिक्षा बंद
– शहरात मंगळवारी बंदला पाठिंबा म्हणून रिक्षा युनियनने दुपारी ३ वाजेपर्यंत रिक्षा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे
– दिल्ली गेट येथील रास्ता रोकोमध्ये सर्व रिक्षाचालक सहभागी होणार
– बस, रेल्वे, विमानसेवा राहणार सुरू
– व्यापारी महासंघाकडून शेतकरी संपाला समर्थन परंतु व्यापारी प्रतिष्ठाने बंद राहणार नसल्याचे केले स्पष्ट
– प्रवाशांची सोय व्हावी म्हणून शहरांतर्गत स्मार्ट सिटी बस राहणार सुरू
– जिल्ह्यातील फुलंब्री, कन्नड, वैजापूर, पैठण आदी तालुक्यांतील बाजार समित्यांतील व्यवहार राहणार बंद

परभणी : व्यापारी, नागरिकांना सहभागी हाेण्याचे आवाहन
– बंददरम्यान राज्य परिवहन महामंडळाची बससेवा बंद ठेवण्यासंदर्भात सायंकाळपर्यंत वरिष्ठांकडून कोणतेही आदेश आले नाहीत
– परिस्थिती पाहून एसटी बसेस सोडण्यात येतील, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक मुक्तेश्वर जोशी यांनी दिली
– परभणी मार्केट व्यापारी असोसिएशन नवा मोंढा येथील ्व्यवहार बंद ठेवून बंदला पाठिंबा देणार
– परभणी येथे नवा मोंढ्यातील एकता हमाल मजदूर युनियनने बंदला पाठिंबा दिला

नांदेड : परिस्थिती पाहून एसटी करणार सुरू
– जिल्ह्यात परिस्थिती पाहून एसटी बसेस सुरू ठेवायच्या की नाही याचा विचार केला जाणार आहे
– विभाग नियंत्रकांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटणकर यांच्या सूचनेनुसार बस सुरू ठेवण्याचा निर्णय -शहरातील – विविध महामार्गांवर काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती
– जिल्हाभर रास्ता रोको, चक्का जाम करण्याचा काँग्रेस प्रवक्ते संतोष पांडागळे यांचा इशारा

उस्मानाबाद : व्यापाऱ्यांसह विविध संघटना संपात होणार सहभागी
– दिल्लीतील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला उस्मानाबादकरांनी दिला पाठिंबा
– मंगळवारी सकाळी शहरातून सर्वपक्षीय कार्यकर्ते व संघटनेचे कार्यकर्ते व्यापारी व नागरिकांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करतील
– उस्मानाबादसह जिल्ह्यातील बाजारपेठ उद्या बंद राहण्याची शक्यता
– उस्मानाबादच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा मात्र यासंदर्भातील निर्णय रात्री उशिरापर्यंत झाला नसल्याची माहिती

हिंगाेली : मोंढ्यात खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद
– मोंढ्यातील शेतीमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद राहतील
– कडकडीत बंद, पुढील काळात रस्त्यावर उतरण्याचा शिवसेना आमदार संतोष बांगर यांचा इशारा
– एसटी महामंडळाच्या बसेसदेखील परिस्थिती पाहूनच सोडल्या जाणार
– राजकीय पक्षांनी नांदेड नाका, खटकाळी बायपास, अकोला बायपास येथे रास्ता रोकोचा दिला इशारा
– आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संभाजी ब्रिगेडने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले सुरू

जालना : कंपन्या, रुग्णालये, सरकारी कार्यालये सुरू
– सरकारी, खासगी दवाखाने, मेडिकल, किराणा दुकान, सरकारी कार्यालये, औद्योगिक कंपन्या सुरू राहणार
– काही कामगार संघटनांनीही संपाला पाठिंबा दर्शवला आहे
– कापूस खरेदी वगळता कृषी उत्पन्न बाजार समिती, ट्रान्सपोर्ट, हमाल, मापाडी, कृषी विक्री, बी-बियाणे, बाजारपेठा, वर्दळीच्या ठिकाणांवरील भाजीपाला विक्री हे बंद राहतील
– परिस्थिती लक्षात घेता सराफा, कपडा, हॉटेल व्यावसायिकही बंद ठेवण्यासाठी पुढाकार घेणार

बीड : शहर, तालुक्यांत निदर्शने
– वैद्यकीय सेवा वगळता जिल्ह्यात सर्वत्र बंद पाळला जाण्याची शक्यता
– एसटी सुरू ठेवण्याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल
– बीडमध्ये सर्व शेतकरी संघटना, पुरोगामी संघटना, राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षाचा पाठिंबा
– जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व तालुक्यांमध्ये निदर्शने केली जाणार आहेत
– शेतकरी संघटना, अखिल भारतीय शेतकरी संघर्ष समन्वय समिती, राष्ट्रीय किसान मोर्चा, शेतकरी कामगार पक्ष, संविधान सेना, संभाजी ब्रिगेड, बसपा, भारतीय बेरोजगार परिषद, ओबीसी महासंघ आदींनी संपाला दिला पाठिंबा

नांदेडमध्ये शीख बांधवांचा मोर्चा
दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनामुळे सोमवारी शहरात वातावरण तापले. पंजाबच्या शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी शीख बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन केले. या आंदोलनात लंगरसाहिब गुरुद्वाराचे संत बाबा बलविंदरसिंघजी सहभागी झाले.शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी भारत बंदचे आवाहन करण्यात आले. त्यापूर्वीच सोमवारी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शहरातील शीख बांधव रस्त्यावर उतरले. ट्रॅक्टरसह रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन झाल्यानंतर संत बाबा बलविंदरसिंघजी यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटणकर यांना मागण्यांचे निवेदन दिले.

blank