
गोंदिया,दि. ०९ :१२ व १३ डिसेंबर २०२० रोजी राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात वाशिम जिल्ह्यासह राज्यातील विविध कंपन्यांमधील सुमारे ६५ ते ७० हजार रिक्त जागा भरण्याचे नियोजित आहे. त्या अनुषंगाने रोजगार इच्छुक उमेदवारांना www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रतेनुसार आजपासूनच सहभागी होता येणार आहे.
महारोजगार मेळाव्यात जिल्ह्यासह राज्यातील इतर जिल्ह्यातील इयत्ता चौथी उत्तीर्ण ते सर्वशाखीय डिप्लोमा, आय.टी.आय. तसेच पदवी आणि पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता असणाऱ्या रोजगार इच्छुक स्त्री, पुरुष उमेदवारांना त्यांच्याकडील एम्प्लॉयमेंट कार्डच्या युझरनेम व पासवर्डमधून मेळाव्यात सहभागी होता येईल. उमेदवारांना पसंतीक्रमानुसार व उद्योजकांच्या सोयीनुसार मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ उद्योजकांकडून एस.एम.एस., दूरध्वनी, ई-मेल किंवा सोयीच्या माध्यमाद्वारे कळविण्यात येईल. त्यानुसार ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलखाती घेण्यात येणार आहेत.
सदर “महारोजगार मेळावा” ही उद्योजक व बेरोजगार उमेदवारांसाठी एक सुवर्ण संधी असुन याचा लाभ सर्व संबधीतांनी घ्यावा. जिल्ह्यातील सर्व औद्यागीक आस्थापना, हॉटेल्स, मॉल्स, दवाखाने व निरनिराळे औद्योगीक संस्था यांनी त्यांच्या आस्थापनांमधील रिक्तपदे भरण्याकरीता सदर वेबपोर्टलवर नोंदणी करुन मागणी नोंदवावी. मेळाव्यामध्ये आपला सहभाग घेण्याकरीता उद्योजकांनी व उमेदवारांनी http:www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर भेट द्यावी. उमेदवार Mahaswayam App हे ॲप आपल्या स्मार्ट / अँडरॉईड मोबाईल वर डाऊनलोड करुन सुध्दा या सर्व सुविधांचा लाभ घेऊ शकता. एका अर्थाने नोकरीचा शोध आता आपल्या हाताच्या तळव्यावर उपलब्ध झालेला आहे.
याबाबत काही अडचण किंवा मदत हवी असल्यांस 07182-231150 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
यामध्ये एक बाब विशषत्वाने नमुद करावयाची आहे की, याबाबत कोणतेही नोंदणी शुल्क नसुन सदर मेळाव्यामध्ये मोफत सहभाग घेता येणार आहे.
तरी सर्व आस्थापना व नोकरी ईच्छुक उमेदवारांना कळकळीची विनंती आहे की, त्यांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन वि .रा. रिसे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गोंदिया यांनी केलेले आहे.
अशी करा ऑनलाईन नोंदणी-
1. गोंदिया जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी संकेतस्थळ www.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर जाऊन जॉब सीकर (job seeker) वर क्लीक करुन स्वत:चा युजर आयडी आणि पासवर्डच्या आधारे लॉगीन करावे.
2. त्यांनतर डॅशबोर्डमधील पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर यावर क्लीक करुन प्रथम नागपुर विभाग व त्यांनतर गोंदिया जिल्हा निवडुन त्यातील State Level Mega Job Fair वर या रोजगार मेळाव्याची निवड करावी.
3. यानंतर उद्योजक निहाय रिक्तपदांची माहिती घ्यावी.
4. आवश्यक पात्रतेनुसार ऑनलाईन पध्दतीने पसंतीक्रम नोंदवुन मेळाव्यात सहभागी होता येईल.





