35.5 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ मुद्रांक शुल्क सवलतीचा लाभ घ्या;सुट्टीच्या दिवशीही कार्यालय सुरू असणार

मुद्रांक शुल्क सवलतीचा लाभ घ्या;सुट्टीच्या दिवशीही कार्यालय सुरू असणार

0
57

भंडारा दि.10: 31 डिसेंबर 2020 पर्यंत दस्त नोंदणी केल्यास नगर परिषद व प्रभाव क्षेत्रासाठी 3 टक्के तर ग्रामीण क्षेत्रासाठी 2 टक्के मुद्रांक शुल्कात शासनाने सवलत घोषित केली असून या सवलतीचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सह जिल्हा निबंधक रविंद्र पाटील यांनी केले आहे.

          दस्तऐवज नोंदणीची सुविधा भंडारा जिल्ह्यातील सह दुय्यम निबंधक वर्ग-2 कार्यालय भंडारा, दुय्यम निबंधक श्रेणी-1 कार्यालय तुमसर, दुय्यम निबंधक श्रेणी-1 कार्यालय मोहाडी, दुय्यम निबंधक श्रेणी-1 पवनी, दुय्यम निबंधक श्रेणी-1 साकोली, दुय्यम निबंधक कार्यालय श्रेणी-1 लाखणी, व दुय्यम निबंधक कार्यालय श्रेणी-1 लाखांदूर येथे 12 डिसेंबर, 19 डिसेंबर व 26 डिसेंबर 2020 रोजी शनिवारला सुट्टीच्या दिवशी सरु ठेवण्यात येतील, या संधीचा जास्तित जास्त लाभ घ्यावा असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग-1 रविंद्र के. पाटील  तथा मुद्रांक जिल्हाधिकारी भंडारा यांनी केले आहे.

blank