

-

१८ जुलै १९७८ रोजी शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. शरद पवार महाराष्ट्राचे सर्वांत तरुण मुख्यमंत्री ठरले.

१० जून १९९९ रोजी शरद पवारांनी त्यांच्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची’ स्थापना केली.

केंद्रातही शरद पवारांनी संरक्षणमंत्री आणि कृषीमंत्री म्हणून काम पाहिलं. कृषीमंत्री पदाच्या काळात त्यांनी केलेल्या कामाची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली.

राजकारणाबरोबरच क्रिकेट हे देखील पवारांच्या आवडीचे क्षेत्र आहे. २९ नोव्हेंबर २००५ रोजी ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी निवडून आले. १ जुलै २०१० रोजी त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.

छगन भुजबळ, दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार.
-

२०१७ साली त्यांना पद्मविभूषण हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा नागरी सन्मान देऊन गौरवण्यात आले.


2009 मध्ये लोकसभा निवडणुकीत लाखनी येथे सोनीया गांधी व शरद पवार एकाच मंचावर




