39.9 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home Top News मुख्यमंत्र्यांनी केली रुग्णालयाची पाहणी,विभागीय आयुक्तांवर चौकशीची जबाबदारी

मुख्यमंत्र्यांनी केली रुग्णालयाची पाहणी,विभागीय आयुक्तांवर चौकशीची जबाबदारी

0
143

blank

भंडारा,दि.10ः-भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त करीत आज(दि.10)रुग्णालयाची पाहणी केली. पाहणीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेच्या चौकशीसाठी विभागीय आयुक्त यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली असून या पथकात मुंबई मनपातील अग्निशमन दल प्रमुख यांचा समावेश असेल तसेच या घटनेतील दोषींवर त्वरित कारवाई केली जाईल अशी ग्वाही दिली.यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले,भंडारा पालकमंत्री विश्वजित कदम,भंडारा आमदार नरेंद्र भोंडेकर,विभागीय आयुक्त डाॅ.संजीवकुमार,आरोग्य उपसंचालक डाॅ.जायस्वाल,जिल्हाधिकारी कदम यांच्यासह वरिष्ठ अधिकारी हजर होते.

blank