39.9 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home गुन्हेवार्ता विष प्राशन करुन विवाहितेची आत्महत्या

विष प्राशन करुन विवाहितेची आत्महत्या

0
200

blank

अर्जुनी मोर- तालुक्यातील झरपडा येथील ग्रामपंचायत सदस्या भुमिका शैलेश मेश्राम (40)या विवाहित महिलेने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी पहाटे 6 वाजता च्या सुमारास घडली.
सदर महिला सकाळी अंगण झाडतांना चक्कर येउन पडली.शेजारच्यानी जाऊन तिला ऊचलुन विचारपूस केली असता विष घेतल्याची माहीती दिली.महिलेला अर्जुनी मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला.आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.सदर घटनेची नोंद अर्जुनी पोलिस ठाण्यात करण्यात आली.पुढील तपास ठाणेदार महादेव तोदले यांच्या मार्गदर्शनात पोलीस नायक प्रशांत बोरकर,ज्ञानेश्वर बोरकर करीत आहेत.

blank