35.5 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ बेरोजगारांची समस्या शासन दरबारी मांडणार – आ.अँड.वंजारी

बेरोजगारांची समस्या शासन दरबारी मांडणार – आ.अँड.वंजारी

0
81

blank

आमगाव,दि.१८ः तालुक्यासह जिल्ह्यात बेरोजगारी ही एक प्रमुख समस्या आहे. रोजगाराअभावी येथील युवक महानगरात जात आहेत. तर अनेक बेरोजगार रोजगाराच्या प्रतिक्षेत आहेत. अशा कोरोना संसर्ग काळात बेरोजगारीत भर पडली आहे. रोजगाराअभावी होणारी भटकंती टाळण्यासाठी आपण बेरोजगाराची समस्या शासन दरबारी मांडणार, असे आश्‍वासन आ.अँड.अभिजित वंजारी यांनी दिले.
नागपूर पदवीधर मतदार संघातील महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित आमदार अभिजीत वंजारी यांचा स्वामी विवेकानंद संकुल परिसरात नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात संबोधित करताना ते बोलत होते. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व शिक्षक संघाद्वारा तसेच अँड.अभिजित वंजारी मित्र परिवारच्या वतिने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमाची अध्यक्षस्थानी म्हाडाचे माजी सभापती नरेश माहेश्‍वरी होते. तर मंचावर गोंदिया जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष अँड. एन.डी. किरसान, भंडारा जिल्हा को – आपरेटिव बैकचे अध्यक्ष सुनिल फुंडे, नागपुर विभाग शिवसेनेचे संघटक प्रमुख किरण पांडव आदि मान्यवर उपस्थित होते.
त्यानंतर लगेच पत्रपरिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार वंजारी यांनी सांगितले की, विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळविण्यासाठी, पेन्शन योजना लागू करण्यासाठी, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार तसेच ग्रामीण भागातील शाळेत क्रीडा साहित्य उपलब्ध करून देणार, क्रीडा संकुल उभारण्यासाठी, वाचनालयाना अनुदान मिळेल, याकरिता पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन दिले.
आमगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष इसुलाल भालेकर यानी नव निर्वाचित आमदार अँड.अभिजीत वंजारी याचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी राधाकिसन चुटे, राजीव फुंडे, नरेंद्र कावळे, रितेश अग्रवाल, मुरलीधर करंडे, रेखलाल टेंभरे, विकास शर्मा, महेश मेश्राम उपस्थित होते.

blank