35.5 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home मराठवाडा/खान्देश बेकायदेशीर होर्डिंग्ज, बँनर लावणा-यांवर मनपाची कार्यवाई

बेकायदेशीर होर्डिंग्ज, बँनर लावणा-यांवर मनपाची कार्यवाई

0
104

blank

औरंगाबाद,दि. 21_-: अनधिकृतपणे बनर व होर्डिंग्ज लावणाऱ्यांवर न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे औरंगाबाद महानगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरात बेकायदेशीर बॅनर, होर्डिंग्ज लावणाऱ्यांची यादी तयार करून त्यांना नोटीस पाठविण्यात येत आहे. मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या सूचनेनुसार १६ जानेवारीपासून शहरातील अनधिकृत बॅनर, होर्डिंग काढून संबंधिताना दोन हजार रुपये दंड भरण्यासाठी नोटिसा पाठविण्यात येत आहे.
मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या कलम २४४ आणि २४५ आणि महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम १९९५ नुसार होर्डिंग आणि जाहिराती लावण्याबाबत नियमन केले जाते. यानुसार सार्वजनिक ठिकाणी किंवा तेथून जाणार्‍या व्यक्तीला दिसू शकतील अशा कोणत्याही खासगी जागेवर, इमारतीवर, स्मारक, शिल्प, पुतळा, खांब, भिंती, कुंपण किंवा झाडावर जाहिरात लावण्यास प्रतिबंध आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास हा दखलपात्र अपराध ठरतो. यासाठी तीन महिन्यांपर्यंत कैद आणि दोन हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्हीची तरतूद आहे. अधिकृत जागेशिवाय इतर होर्डिंग अनधिकृत ठरतात, असे असतानाही काहीजण अनधिकृतपणे बॅनर, होर्डिंग लावतात. शहरात असणाऱ्या अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. याशिवाय मनपा आयुक्त करत असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त करत बेकायदेशीर होर्डिंग्ज संदर्भात श्री पाण्डेय यांनी केलेली कारवाई बद्दल कौतुक केले होते. मनपाने बेकायदेशीर होर्डिंग, बॅनरबाजांवर लक्ष केंद्रित करून त्यांची यादी तयार केली आहे. त्यांना नोटीस बजावून न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय शहरातील अनधिकृत बॅनर, होर्डिंग्स १६ जानेवारीपासून काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

Ad

blank