39 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ क.लेखाधिकारी फनेंद्रनाथ हरिणखेडेंचा सेवानिवृत्तीपर सत्कार

क.लेखाधिकारी फनेंद्रनाथ हरिणखेडेंचा सेवानिवृत्तीपर सत्कार

0
115

blank

गोंदिया,दि.29ः-गोंदिया जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासह गोरेगाव,आमगाव व गोंदिया पंचायत समितीमध्ये गेली 35 वर्ष कनिष्ठ लेखाधिकारी म्हणून सेवा दिल्यानंतर 31 जानेवारी 2021 रोजी वयोमानानुसार फनेंद्रनाथ हरिणखेडे सेवानिवृत्त होत असल्याने त्यांचा आज(दि.29)गोंदिया पंचायत समितीच्या सभागृहात प्रभारी गटविकास अधिकारी दिलीप खोटेले यांच्या हस्ते शाळश्रीफळ व भेटवस्तु देऊन सत्कार करण्यात आला.18 आँगस्ट 1986 ला तत्कालीन भंडारा जिल्हा परिषदेत त्यांनी नोकरीला सुरवात केली.त्यापैकी 30 वर्ष हे त्यांनी आरोग्य विभागात नौकरी केली.त्यानी नोकरी काळातच उत्तम शेतीलाही चालना देत आपल्या शेतीमध्ये आधुनिक शेतीचा प्रयोग करुन पिक घेण्याच सतत प्रयत्न केलेला आहे.सेवानिवृत्तीनतंर शेतीमध्ये अजून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन आपला वेळ तिथे घालवण्याचा त्यांनी मानस व्यक्त केलेला आहे.

blank