39.9 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home राजकीय औरंगाबाद येथे होणाऱ्या पँथरच्या अधिवेशनाची जोरात तयारी सुरु- अँड. रमेशभाई खंडागळे

औरंगाबाद येथे होणाऱ्या पँथरच्या अधिवेशनाची जोरात तयारी सुरु- अँड. रमेशभाई खंडागळे

0
42

blank

औरंगाबाद, दि. 08-भारतीय दलित पँथरच्या पुनर्गठणाची चौथी बैठक ५ जानेवारी २०२१ ला नांदेड येथे झाली. या बैठकीत पँथरचे अधिवेशन औरंगाबाद येथे घेण्यात यावे असे ठरले. हे अधिवेशन येत्या २३ फेब्रुवारी २०२१ ला संत गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्त औरंगाबाद येथे घेण्यात येणार असल्याचे पँथरचे प्रमुख संयोजक अँड. रमेशभाई खंडागळे यांनी सांगितले.

यासंबधी सविस्तर माहिती देतांना त्यांनी सांगितले की, देशात जातीयवादी सरकार सत्तेवर आल्यापासून दलित, ओबीसी आणि आदिवासी त्याचप्रमाणे अल्पसंख्याक समाजावर अन्याय अत्याचार खुप वाढले असून १९७२ पेक्षाही भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. या अन्याय अत्याचाराचा मुकाबला करण्यासाठी पँथरची पुर्वीपेक्षाही आज खुप आवश्यकता आहे. यासाठी पँथरचे सर्व छोटे मोठे ग्रूप एकत्र करुन पँथरची एकच व शक्तिशाली संघटन बनविण्यासाठी आम्ही पँथरच्या महाराष्ट्रात वेगवेगळया ठिकाणी बैठका घेऊन सर्वांशी संपर्क केला व विचारांती नांदेड येथे झालेल्या बैठकीत एक महत्वपूर्ण व ऐतिहासिक अधिवेशन औरंगाबादसारख्या ऐतिहासिक व आंबेडकरी चळवळीचे प्रमुख केंद्र असलेल्या शहरात घेण्याचे निश्चित करण्यात आले.
या निर्णयानुसार दशरथ लोहबंदे, दिंगबर मोरे, एन.डी.गवळे, रमेशभाऊ सोनाळे, डी. डी. वाघमारे (नांदेड), संजय कांबळे, अशोक कांबळे, किशोर कांबळे (लातूर), आयुष्यमान माने (उस्मानाबाद), शे. खुर्शीदभाई, स्वप्निल ब्रम्हराक्षे, मधुकर काळे (परभणी), अँड. शिवाजी आदमाने, अँड. किशोर चतरे (जालना), अँड.रमेशभाई खंडागळे, प्रा. अंबादास ढोके, ओमपाल चावरीया (औरंगाबाद), प्रा. अमर पांडे , प्रा. अमोल वेटम (सांगली), भिकाजी इंगळे, प्रा.बाबूरव गायकवाड, अशोक वानखेडे(बुलडाणा), सुर्यकांत शिंदे (अहमदनगर), रामचंद्र माने, प्रा. दिपक गायकवाड (पुणे) त्याचप्रमाणे विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाडयात अनेक कार्यकर्त्याशी तसेच महाराष्ट्राबाहेर गुजरात, उत्तरप्रदेश, दिल्ली, पंजाब येथील पँथरमध्ये सक्रीय असलेल्या कार्यकर्त्याशी संपर्क व संवाद करुन हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सर्व स्तरावरुन प्रयत्न करण्यात येत आहेत. गुजरातचे राहुलभाई परमार, दिल्लीचे अँड. विकास फकिडे, उत्तरप्रदेशचे साथी धनीराम सिंह यांना अधिवेशनास आमंत्रित करण्यात आले आहे.
या अधिवेशनास कार्यकर्त्यांनी व जनतेनी मोठया संख्येने सामील होऊन हे अधिवेशन यशस्वी करावे असे आवाहन रामेश्वर निकाळजे, संभाजी साबळे, अशोक श्रीखंडे, माणिक पगडे, मधूकर घोरपडे, सिध्दार्थ ठोकळ, गणेश चव्हाण, भय्यासाहेब चव्हाण, सुनील निंभोरे, रमेश पवार, शिवाजी पाचरणे, हिरालाल मगरे, एकनाथ त्रिभूवन, अनिल साळवे, बंडू तुळवे, संजय चिकसे, प्रा. संतोष डोंगरे, उमेश सरदार, साईनाथ जंगम यांनी केले आहे.

blank