39.9 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home Top News लाल किल्यावर धार्मिक झेंडा फडकवणारा पंजाबी सिंगर दीप सिद्धू पोलिसांच्या ताब्यात

लाल किल्यावर धार्मिक झेंडा फडकवणारा पंजाबी सिंगर दीप सिद्धू पोलिसांच्या ताब्यात

0
75

blank

नवी दिल्ली--दिल्लीत 26 जानेवारीला ट्रॅक्टर परेडदरम्यान लाल किल्यावर धार्मिक झेंडा फडकावणे आणि हिंसा भडकवल्याचा आरोप असलेल्या पंजाबी सिंगर दीप सिद्धूला पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले. त्याच्यावर दिल्ली पोलिसांनी एक लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, दीप सिद्धू अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये राहणाऱ्या एका मित्राच्या संपर्कात होता. दीप त्या मित्राला व्हिडिओ पाठवायचा आणि तो मित्र सोशल मीडिया अकाउंटवर या व्हिडिओला अपलोड करायचा.

आज कुरुक्षेत्रमध्ये महापंचायत

कुरुक्षेत्रमध्ये आज महापंचायतचे आयोजन केल आहे. पण, यापुर्वीच एक वाद झाला आहे. येथे शेतकरी नेते गुरनाम सिंह चढ़ूनीला महापंचायतचे आमंत्रम दिले नव्हते. चढ़ूनी म्हणाले की, त्यांना या महापंचायतची माहिती नव्हती आणि त्यांनी दुसरीकडे आपले कार्यक्रम ठरवले होते. त्यामुळे ते आता य महापंचायतमध्ये जाणार नाहीत. परंतु, महापंचायतचे जसतेज संधू म्हणाले की, चढुनी यांना आमंत्रण दिले होते आणि येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

blank