
गोंदिया, 10 : जिल्हा प्रशासन व पर्यटन संचालनालय यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हयात 27 व 28 फेब्रुवारी 2021 ला बोदलकसा पक्षी पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.
गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रेक्षणीय स्थळ असून पर्यटकांना भुरळ पडणारे निसर्गरम्य ठिकाणसुद्धा आहेत. या सर्व स्थळांची माहिती पर्यटकांना व्हावी व जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळावी या उद्देशाने शासनाने बोदलकसा पक्षी महोत्सव घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार येत्या 27 व 28 फेब्रुवारी 2021 रोजी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.
यामध्ये वन विभाग, शिक्षण विभाग, कृषि विभागाचे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. जिल्हयातील पर्यटनप्रेमी, पक्षीमित्र यांचा महोत्सवात सहभाग राहणार आहे. सदर महोत्सवामध्ये सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.





