39.9 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home राजकीय रिपाइंसह स्वाभिमानी, जनसुराज्यची निवडणूक आयोगाकडून नोंदणी रद्द

रिपाइंसह स्वाभिमानी, जनसुराज्यची निवडणूक आयोगाकडून नोंदणी रद्द

0
32

मुंबई दि. २९ – : निवडणूक आयोगाच्या नियमाचे उल्लंघन केल्यामुळे खासदार रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, खासदार राजू शेट्टींचा स्वाभिमानी पक्ष, आमदार कपिल पाटील यांचा लोकभारती आणि जनसुराज्य शक्‍ती पक्षावर मोठी नामुष्की ओढवली आहे. कोल्हापूर आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत या पक्षाच्या उमेदवारांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या सूत्राने दिली. मुदतीत कागदपत्रांची पूर्तता न केल्याने निवडणूक आयोगाने 16 पक्षांची नोंदणी रद्द केली.
राज्यातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, बहुजन समाज पार्टी, भाजप या पक्षांना राष्ट्रीय स्तरावर तर शिवसेना व मनसेला प्रादेशिक पक्ष म्हणून केंद्रीय निवडणूक आयोगाची मान्यता आहे. अन्य पक्ष हे राज्य निवडणूक आयोगाकडे केवळ नोंदणीकृत आहेत.

blank